बंद

    जिल्हा परिषद 20% स्वनिधी

    • तारीख : 01/01/2024 -
    1. जिल्हा परिषदेच्या एकूण उत्पन्नाच्या किमान 20 टक्के इतकी रक्कम अनुसूचित जाती, नवबौद्ध, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी राखून ठेवून सदर रक्कम मागासवर्गीयांच्या वैयक्तिक व सामूहिक लाभांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यात येते. सन 2023-24 या आर्थिक वर्षात रक्कम रु. 4,08,67,300/- इतकी तरतूद करणेत आलेली आहे. त्यामधून वैयक्तिक व सामूहिक योजना घेण्यात आलेल्या आहेत. सदर योजना राबविण्याची कार्यवाही सुरू आहे.

    2. सन 2023-2024 या वर्षामध्ये घेण्यात आलेल्या पुर्व उच्च माध्यमिक (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक (इ.8 वी) या शासकिय शिष्यवृत्ती परिक्षेत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. सदर शिष्यवृत्ती परिक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील इ. 5 वी चे 44 विद्यार्थी व इ. 8 वी चे 39 विद्यार्थी राज्यगुणवत्ता यादी मध्ये झळकले आहेत.

    3. सन 2023-24 मध्ये शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या मार्फत जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या निधीतून इ. 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यात आले आहे.7 कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 351 शाळांमधील 18767 विद्यार्थ्यांना सदर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

    4. समग्र शिक्षा अभियानामध्ये सन 2023-24 मध्ये राष्ट्रीय अभियानातंर्गत 45 विद्यार्थ्यांना इस्त्रो येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

    5. जिल्ह्यातील 3218 दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतनीस, प्रवास, वाचक व प्रोत्साहन भत्ता डीबीटी च्या माध्यमातून 1 कोटी 15 लाख 96 हजार एवढी रक्कम त्यांचे बँक खातेवर देण्यात आली आहे.

    6. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील 6 लाख 21 हजार 373 मुलांची 100 टक्के आरोग्य तपासणी केली. सन 2023-24 मध्ये आरोग्य तपासणी मध्ये हृदयदोष आढळलेल्या एकूण 161 मुलांची यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. यामध्ये 0 ते 2 वर्ष वयोगटातील (नवजात) 126 बालकांची शस्त्रक्रिया झाली. सदरची शस्त्रक्रिया कोकीळाबेन हॉस्पीटल, फोर्टीस हॉस्पीटल, एसआरसीसी हॉस्पीटल मुंबई येथे करण्यात आल्या. या शस्त्रक्रियासाठी जिल्हा परिषद कोल्हापूरहून बालके व त्यांच्या पालकांसाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करुन दिल्या. सन 2023-24 मध्ये हृदय शस्त्रक्रियेसाठी रक्कम रुपये 3 कोटी इतका पालकांचा खर्च वाचविता आला.

    7. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 2 वर्षे वयोगटातील 12 बालकांची कॉक्लिअर इंम्प्लांट (आंतरकर्ण) शस्त्रक्रिया करणेत आली. यामुळे या बालकांना ऐकू आल्यामुळे बोलताही आले आहे. या शस्त्रक्रियेमुळे रक्कम रुपये 1 कोटी 20 लाख पालकांचा खर्च वाचविता आला.

    8. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील 3412 मुलांची इतर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करणेत आली. या शस्त्रक्रियेमुळे रक्कम रुपये 2 कोटी 50 लाख इतका पालकांचा खर्च वाचविता आला.

    9. प्रधानमंत्री मातृवंदन योजने अंतर्गत 9584 लाभार्थींना 3 कोटी 92 लाख रकमेचा लाभ लाभार्थींच्या बँक खातेवर देणेत आलेला आहे.

    10. सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दि. 11 सप्टेंबर 2019 अन्वये अनुकंपा नियुक्ती करताना प्रतिवर्षी रिक्त झालेल्या एकूण पदांच्या 20% पदे भरणेस मान्यता आहे. शासन निर्णय दि.22 डिसेंबर 2021 अन्वये अनुकंपा नियुक्तीची 20% भरतीसाठीची मर्यादा दि. 31/12/2024 पर्यंत वाढविली आहे. दि. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत रिक्त झालेल्या 372 पदांच्या फक्त 20% च्या अनुषंगाने 74 पदे भरणेची कार्यवाही करणेत येणार होती. त्यापैकी 53 उमेदवारांचे दि. 08/03/2023 रोजी आणि 19 उमेदवारांचे दि. 22/08/2023 रोजी असे एकूण 72 उमेदवारांचे समक्ष समुपदेशन घेऊन त्यांना गट क व ड पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

    11. महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने ‘लेक लाडकी’ ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यावर रु.5000/-, मुलगी पहिलीत गेल्यावर रु.6000/-, मुलगी सहावीत गेल्यावर रु.7000/-, मुलगी अकरावीत गेल्यावर रु. 8000/- व मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर रु.75,000/- असे एकूण रक्कम रु.1,01,000/- चा लाभ अनुज्ञेय आहे. सन 2023-24 मध्ये 1400 मुलींना प्रति लाभार्थी रु.5000/- प्रमाणे रु.70,00,000/- अनुदान DBT द्वारे वितरीत करण्यात आले आहे.

    12. जिल्हा परिषद इमारती व निवासस्थान बांधकामे या योजनेतून कोल्हापूर जिल्हा परिषद इमारतीवर चौथा मजला बांधणेत आला असून, मा. पालकमंत्री महोदय कोल्हापूर जिल्हा यांचे शुभहस्ते दि. 26.01.2024 रोजी उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे. सदरचे कामास रक्कम रू. 710.75 लक्ष खर्च झाला आहे. यामध्ये चौथा मजला बांधकाम, दुसरी लिफ्ट व फर्निचरचे काम पूर्ण झाले असून, सदरच्या मजल्यावर शिक्षण विभाग प्राथमिक, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागांच्या कार्यालयांना त्यांच्या आवश्यकतेनुसार जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच चौथ्या मजल्यावर प्रशस्त सभागृह देखील बांधण्यात आले आहे.

    13. जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्तम आरोग्यासाठी अत्याधुनिक जिम्नॅशियम सुरु असुन यामध्ये सातत्य ठेवले आहे.

    14. जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी दि. 04, 05 व 06 फेब्रुवारी 2024 रोजी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

    लाभार्थी:

    वर दिल्याप्रमाणे

    फायदे:

    वर दिल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा