जिल्हा परिषद कोल्हापूर
श्री शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या व पंचगंगेच्या काठी दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या भूमीमध्ये, राजर्षि शाहू महाराजांच्या आदर्श समाज कार्याचा वारसा घेवून, कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्ह्यांतील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. पूर्वेस सांगली, दक्षिणेस सिंधुदुर्ग, पश्चिमेस रत्नागिरी व उत्तरेस सातारा अशी जिल्ह्याची चतुःसिमा असून, जिल्ह्यांतून कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या प्रमुख नद्या वाहतात. सन २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३५,२३,१६२ असून त्यापैकी नागरी १०,५०,३५३ व ग्रामीण २४,७२,८०९ लोकसंख्या आहे. जिल्ह्यात १२ तालुके असून १२ पंचायत समित्या, १ महानगरपालीका, ९ नगरपरिषदा व १,०२८ ग्रामपंचायती आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जिल्हा परिषदेमध्ये होणार्या कामकाजाच्या माहितचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणार्या कामकाजाची पारदर्शकता दृगोचर व्हावी, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहेत.
आपल्या सुचना, अभिप्राय व मार्गदर्शन विकास प्रक्रियेतील आमचे प्रेरणास्त्रोत असतील. संकेतस्थळामधील योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत लाभ घेतला जाईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.
धन्यवाद... जिल्हा परिषद, कोल्हापूर