आषाढी यात्रेसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यासाठी जिल्हा परिषद मार्फत वैद्यकीय मदत पथक रवाना

आषाढी यात्रेसाठी अवघा महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेश या राज्यातील लाखो वैष्ण्‍व, वारकरी  श्री पांडुररंगाच्या भेटी अंतुर झालेला असतो.  सर्व राज्यातून पंढरपूरला जाणेसाठी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आलेले असते. दिंडी मध्ये जेष्ठ नागरिक, महिला,  पुरुष  मोठया प्रमाणात असतात. सर्व वारकरी मोठया श्रध्देने पायी चालत जात असतात.  सलग 15-20 दिवस चालत जावे लागत असल्यामुळे पायाला गोळे येणे, जांघेत गाठ येणे, पाय दुखणे, ताप, साथ प्रतिबंधक सेवा, पोट विकार पाणी शुध्दीकरण  तसेच अत्यावश्यक सेवा, संदर्भ सेवा आवश्यक असते. गेल्या अनेक वर्षापासून आषढी, माघ वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यासांठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत आरोग्य पथक पाठविण्यात येत आहे.  सदर वैद्यकीय मदत पथकांचे शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री अमन मित्तल,  जिल्हा आरोग्य अधिकारी  मा. डॉ. योगेश साळे यांचे शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी  जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.  फारुख देसाई ,  श्री एम एम पाटील. मार्केट यार्ड येथील विठ्रठल मंदिर प्रमुख श्री. वारके आण्णा, येवती येथील दिंडी प्रमुख ह भ प बी. डी. पाटील, रंगा वायदंडे श्री घुले,  उपस्थित होते. दोन वै्द्यकीय मदत स्थापन करण्यात आले असून डॉ विवेक जोशी, वैद्यकीय अधिकारी पथक प्रमुख असून हे पथक कोल्हापूर  नृसिंहवाडी, जयसिंगपूर, मिरज मार्गे पंढरपूर ला जाणार आहे. तर डॉ अरुण गवळी , वैद्यकीय अधिकारी यांचे पथक कोल्हापूर ते मिरज, लोणंद, नातेपुते, माळशिरस, वेळापूर मार्गे पंढरपूर येथे जाणार आहे. पथकामध्ये  आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, वाहन चालक इ. कर्मचारी असतील. मागील वर्षी वैद्यकीय मदत पथकामार्फत 6000 रुग्णांना उपचार करण्यात आले होते.

या प्रसंगी बोलतांना मा. अमन मित्तल यांनी सर्व देश व राज्यातील जनतेला  सर्वांना सुख, समृध्दी , समाधान ,आरोग्य मिळावे असे पांडुरंग चरणी साकडे घातले. यात्रा कालावधीमध्ये पायी वारी करण्याचा मनोदय व्यक्त केला. असून यात्रेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभार प्रसंगी डॉ साळे बोलतांना म्हणाले की, जि. प. अध्यक्ष्या मा. सौ शौमिका महाडिक,  आरोग्य सभापती मा. श्री. सर्जेराव पाटील पेरीडकर, मा. श्री. अमन मित्तल यांच्या संकल्पनेतून हे पथक काम करीत असून सर्वाना शुभेच्छा दिल्या.

                                                                                                            जिल्हा आरोग्य अधिकारी

                                                                                                            जिल्हा परिषद कोल्हापूर