केंद्र शासनाचा पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 राज्यामध्ये गुणांकनानुसार जिल्हा परिषद कोल्हापूरचा प्रथम क्रमांक

ग्रामविकास विभागाकडील जाक्रं झेडपीए 2018/प्रक्रं 145/पंरा 1दिनांक 28 जानेवारी 2019 च्या प्राप्त पत्रानुसार केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कार 2019 अंतर्गत (तपासणी वर्ष 2017-18) जिल्हा परिषदेने केंद्रस्तरावर ऑनलाईन्‍ प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने  जिल्हा परिषद कोल्हापूरची मा. श्री  श्रीनिवास बावा व श्री ‍ अनिल कुमार  या दोन सदस्यीय  केंद्रीय पथकाकडुन दि. 07-02-2019 ते 09-02-2019 अखेर जिल्हा परिषदेची कागदपत्रांची व क्षेत्र स्तरावरील प्रत्यक्ष पडताळणी करणेत आलेली होती.

पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार, यांच्या मार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 चा निकाल केंद्र शासनाकडील दिनांक 16-09-2019 च्या पत्रान्वये नुकताच जाहिर झाला आहे.  यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने सादर केलेल्या नामांकनास राज्यामध्ये प्रथम पारितोषिक (प्रमाणपत्र व रक्कम रुपये 30 लाख  या स्वरुपात) मिळाले  आहे.

सदर जाहीर झालेल्या पुरस्काराचा आनंदोत्सव आज दि. 19-09-2019 रोजी जिल्हा परिषदेत साजरा करणेत आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सौ शौमिका महाडिक अध्यक्ष जि.प. कोल्हापूर यांचे  हस्ते पेढे व साखर वाटुन साजरा करणेत आला. यावेळी मा. अमन मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. सर्जेराव पाटील उपाध्यक्ष उपस्थितीत होते. याप्रसंगी मा.अध्यक्ष सौ शौमिका महाडिक यांनी मार्गदर्शन करताना सर्वांचे अभिनंदन केले व सर्व जिल्हा परिषदासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद पथदर्शी असलेचे नमुद करुन भविष्यात नाविन्यपुर्ण योजना राबवावेत व देशात प्रथम क्रमांक मिळवावेत यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. मा. अमन मित्तल  यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच सर्व पदाधिकारी , जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी-कर्मचारी यांच्या एकत्रित कामाचे यश असलेचे नमुद केले. येथुन पुढील पुरस्कार मिळवणेसाठी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी मा. रविकांत आडसुळ उपमु.का.अ. (साप्र) यांनी पुरस्कारसंदर्भात प्रास्ताविक व स्वागत केले आणि मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमती प्रियदर्शनी मोरे उप.मु.का.अ.(पाणी व स्वच्छता) यांनी मनोगत व्यक्त केले. कर्मचारी संघटना प्रतिनिधी श्री महावीर सोळांकुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच पत्रकार प्रतिनिधी श्री समीर देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करुन कोल्हापूरचे नाव देशात मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त केल्या व शुभेच्छा दिल्या. यानंतर श्री राहुल कदम उप मु.ले. व वि.अ. यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी जिल्हा परिषदेचे श्री सर्जेराव पाटील-पेरीडकर सभापती आरोग्य व बांधकाम समिती, गटनेते श्री अरुणराव इंगवले, जि.प. सदस्य श्री विजय बोरगे, व जि. प. सदस्य श्री महेश चौगुले, जि. प. सदस्य श्री सुभाष सातपुते तसेच खातेप्रमुख व कर्मचारी  वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री बी.पी माळवे यांनी केले.