कोल्हापूर सारख्या संपन्न व सुबत्तायुक्त जिल्हयात स्त्रीभ्रुणहत्येमुळे मुलींचे प्रमाण कमी होत असल्यामुळे याचा प्रतिबंध करणेसाठी सर्व विभागांनी एकत्र कार्यवाही करावी – डॉ. कुणाल खेमणार

जिल्हास्तरीय  पी.सी.पी.एन.डी.टी ॲक्ट (स्त्री भ्रुण हत्या विरोधी कायदा) व बोगस डॉक्टर शोध मोहीम कार्यशाळा संपन्न दि. 11 मे 2017

आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालय सी पी आर कोल्हापूर यांचे सयुक्त विद्यमान दि. 11 में 2017 रोजी जिल्हास्तरीय  पी सी पी एन डी टी ॲक्ट (स्त्री भ्रुण हत्या विरोधी कायदा) व बोगस डॉक्टर शोध मोहीम कार्यशाळा जिल्हयातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालय तसेच तालुका आशा समुहसंघटक यांचेसाठी आयोजीत करणेत आली होती. सदर कार्यशाळेचे उद्घाटन मा. श्री. डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे हस्ते करणेत आले. सदर कार्यशाळेत  मा. सतिश माने पोलिस उपअधिक्षक मुख्यालय, मा. श्रीमती. मनिषा एस. जवंजाळ पाटील सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, मा. डॉ. एल.एस.पाटील जिल्हाशल्यचिकित्सक व मा.डॉ. प्रकाश पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. डॉ. प्रकाश पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले.

  1. कोल्हापूर सारख्या संपन्न व सुबत्तायुक्त जिल्हयात स्त्रीभ्रुणहत्येमुळे मुलींचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खेद व्यक्त केला व याचा प्रतिबंध करणेसाठी सर्व विभागानी एकत्र कार्यवाही करणेची अपेक्षा व्यक्त केली. तसेच असे दुष्ट प्रकार सुशिक्षीत समाजात घडणे जिल्हयास भुषणावह नाही असे मनोगत व्यक्त केले. स्त्री भ्रुण हत्या विरोधी कायदा अंमलबजावणीसाठी गावोगावी नेमलेल्या आशा,अंगणवाडीसेविका व आरोग्य सेविका यांनी सक्रिय सहभागी होण्याची आवश्यकता नमुद केली.
  2. पोलिस विभागातर्फे मा. सतिश माने पोलिस उपअधिक्षक मुख्यालय व तपासअधिकारी (API) श्री शरद मेमाने यांनी मार्गदर्शन केले. तसेच FIR दाखल करताना लागणारे आवश्यक कागदपत्र व पुरावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
  3. मा. श्रीमती. मनिषा एस. जवंजाळ पाटील सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांनी औषधासंबधीत संपुर्ण नियमावलीची माहिती दिली.
  4. जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. एल.एस.पाटील यांनी पी.सी.पी.एन.डी.टी कायदा, गर्भपात कायदा व महाराष्ट्र नर्सिंग कायदा याबद्दल मार्गदर्शन केले.
  5. सदर कार्यशाळेला डॉ. राजेंद्र भस्मे दंत वैद्यक परिषद व डॉ. राजकुमार पाटील प्राचार्य होमीओपॅथीक मेडीकल कॉलेज कोल्हापूर यांनी संबधीत वैद्यक परिषदाबद्दल माहिती सांगीतली
  6. सहभागी प्रशिक्षणार्थीपैकी डॉ. उत्तम मदने तालुका आरोग्य अधिकारी हातकणंगले व डॉ. थोरात वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय कसबा बावडा यांनी मनोगत व्यक्त केले.
  7. सर्व विभाग प्रमुखांनी सध्या चालु असलेली धडक मोहीम अति तिव्रतेने राबवून बोगस डॉक्टर व स्त्री भ्रुण हत्या करणाऱ्या डॉक्टर व सर्व संबधीत घटकावर एकत्रीत व कडक कायदेशीर कार्यवाही करण्याचे ठरविले आहे.
  8. डॉ. विजय नाद्रेकर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यशाळेसाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती डॉ. स्मिता खंडारे, श्रीमती ॲडव्होकेट गौरी पाटील पी.सी.पी.एन.डी.टी कायदे सल्लागार व संजय सावंत एनआरएचएम कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्हा परिषद कोल्हापूर