जिल्हा परिषदेविषयी

श्री शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या व पंचगंगंच्या काठी दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या भूमीमध्ये, राजर्षि शाहू महाराजांच्या आदर्श समाज कार्याचा वारसा घेवून, कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्ह्यांतील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. पूर्वेस सांगली, दक्षिणेस सिंधुदुर्ग, पश्चिमेस रत्नागिरी व उत्तरेस सातारा अशी जिल्ह्याची चतुःसिमा असून, जिल्ह्यांतून कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या प्रमुख नद्या वाहतात. सन २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३५,२३,१६२ असून त्यापैकी नागरी १०,५०,३५३ व ग्रामीण २४,७२,८०९ लोकसंख्या आहे. जिल्ह्यात १२ तालुके असून १२ पंचायत समित्या, १ महानगरपालीका, १० नगरपालिका  व १,०२९ ग्रामपंचायती आहेत.

अ.क्र. बाब परिमाण जिल्हा माहिती
भौगोलिक स्थान उत्तर अक्षांस अंश १६     ४२
पूर्व रेखांश अंश ७४   १५
एकूण भौगोलिक क्षेत्रफळ हेक्टर ७,७४६ चौ. मी.
लोकसंख्या ग्रामीण लोकसख्या संख्या २६,४५,९९२
ग्रामीण पैकीअनुसूचित जाती जमाती संख्या संख्या अ.जा ३५५६४१ अ. ज. २२३१८
(जनगणना २००१) शहरी लोकसंख्या संख्या १२,३०,००९
प्रमाणे एकूण लोकसंख्या (ग्रामीण व शहरी) संख्या ३८,७६,००१
लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. ४५५
स्त्रीयांचे प्रमाण प्रति हजार पुरुष संख्या ९४९
दारिद्गय रेषेखालील कुटुंब संख्या (सन २००२ चे सेन्सस प्रमाणे) संख्या ९८६९६ (ग्रामीण)
प्रशासकीय रचना तालूके संख्या १२
महानगरपालीका संख्या
नगरपालिका संख्या १०
पंचायत समिती संख्या १२
ग्रामपंचायत संख्या १०२९
महसुल उप विभाग संख्या
जि प बांधकाम उपविभाग संख्या ६(१२ तालुक्यासाठी)
जि प ग्रामीण पाणीपुरवठा विभाग संख्या ९ + (१यांत्रिकी उपविभाग)
एकूण जि.प.प्राथमिक शाळा संख्या २०१७
एकूण जि.प.माध्यमिक शाळा संख्या
ए.बा.वि.से.योजना प्रकल्प संख्या १६
एकूण अंगणवाडी संख्या ३९९४ (पैकी मिनी ७८)
१० प्राथमिक आरोग्य केंद्ग संख्या ७३
११ प्राथमिक आरोग्य उपकेंद्ग संख्या ४१३
१२ ग्रामीण रुग्णालय संख्या १८
१३ जिल्हा रुग्णालय संख्या
१४ उप जिल्हा रुग्णालय संख्या
१५ पशुवैद्यकीय दवाखाने संख्या १३८
श्रेणी-१ :  ८०
श्रेणी-२ :  ५७
फिरते पशु.दवाखाने श्रेणी-१ :  ०२
  • यशवंत पंचायत राज अभियान २०१०-११ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेस राज्य स्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २००९१० अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमघ्ये ग्रा.प. बटकणंगले ता.गडहिंग्लज या ग्रामपंचायतीला विभागीय स्तर द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तसेच विभागीय स्तरावर विशेष पारितोषिक अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती पारितोषिक (सामाजीक एकता व समरसता पुरस्कार) ग्रामपंचायत सिध्दनेर्ली ता.कागल ला देणेत आला आहे.
  • संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत सन २०१०११ अखेर जिल्ह्यातील ९८४ ग्रामपंचायती व ५ तालुक्यांना निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे. जिल्ह्यातील उर्वरीत ४३ ग्राम पंचायती, ७ तालूके, व जिल्ह्याचा निर्मल ग्राम पुरस्कारासाठी प्रस्ताव केंद्ग शासनास सादर केलेला आहे. सद्यस्थितीत केंद्गीय तपासणी पूर्ण झाली आहे.
  • स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमधून कौशल्यवृध्दी प्रशिक्षण कार्यक्रम (गारमेंट) विशेष प्रकल्प केंद्ग शासनाकडून मंजूर झालेला आहे. सदर प्रकल्पाचा उद्देश कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्गय रेषेखालील कुटुंबातील बेरोजगार युवकयुवतींना स्वरोजगारातून उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन देणे हा आहे. सदर प्रकल्पामधून ३ वर्षात ५००० स्वरोजगारींना प्रशिक्षण देवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
  • राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार अंतर्गत सन २०१०११ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिवपार्वती महिला बचत गट व महालक्ष्मी महिला बचत, शिप्पूर तर्फ नसरी ता.गडहिंग्लज या बचत गटांना विभागीय स्तरावर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे.
  • लेक वाचवा अभियान लक्ष्मी आली घरी कोल्हापूर जिल्ह्यातील बालिकाच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी आरोग्य विभागामार्फत २ ऑक्टोबर २००७ पासुन लेक वाचवा अभियान विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन राबविणेत येत आहे. यामध्ये अधिक सुधारणा होण्यासाठी १ ऑक्टोबर, २०१० पासुन लक्ष्मी आली घरी ही नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या व दुसर्यानवेळी जन्मास येणार्याव बालीकेचे स्वागत तिला थर्मल किट (गोधडी, मच्छरदाणी, बाबासुट) व बेबी किट त्यामध्ये जॉन्सन साबण तेल पावडर, इ. तसेच बालिकेच्या आईस साडी चोळी प्रमाणपत्र व सागवाण रोप देवून तिचा सत्कार करणेत येतो. माहे मार्च २०११ पर्यंत एकूण २९३८ लाभार्थींना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे.
  • राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१०११ मध्ये महाराष्ट्र राज्याची प्रगती ९२.२२% इतकी साध्य झालेली असून कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती मार्च २०११ अखेर १२७.९०% इतकी साध्य झाली आहे. राज्यामध्ये या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा दुसर्याी क्रमांकावर आलेला आहे.
  • जागतीक बँक अर्थसहाय्यीत जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत सन २०१०११ मध्ये एकूण उद्दिष्टाच्या ९८.१२% साध्य करुन कोल्हापूर जिल्हा राज्य क्रमवारीत प्रथम स्थानावर राहीला आहे.
  • राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सन २०१०११ मध्ये बायोगॅस सयंत्र उभारणीचे ५५०० उद्दिष्टापैकी ५५०३ सयंत्रे बांधून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्याच्या उद्दिष्टाच्या टक्केवारीत २८ टक्के हिस्सा कोल्हापूर जिल्ह्यातील कामाचा आहे. ५५०३ सयंत्रापैकी ५३९३ सयंत्राना शौचालय जोडलेली आहेत.
  • यशवंत पंचायत राज अभियान २०१५-१६ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेस राज्य स्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
wpChatIcon
wpChatIcon