जिल्ह्यातील 100% शाळा डिजिटल होणार

* जिल्ह्यातील 100% शाळा डिजिटल होणार *

मंगळवार दि. 18/04/2017 रोजी डॉ.बापूजी साळुंखे स्मृती भवन स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे डिजिटल शाळा प्रेरणा कार्यशाळेचे आयोजन दोन सत्रामध्ये करणेत आले होते, यामध्ये 1410 जणांची सहभाग घेतला. कार्यशाळेस श्री.हर्षल विभांडीक, मॅनेजिंग डायरेक्टर, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, न्यूयॉर्क यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी धुळे जिल्हा 100% डिजिटल करताना आलेले अनुभव व राबविलेले उपक्रम याची माहिती सर्वांना दिली. ग्रामसेवक, ग्रामपंचायत व शिक्षक यांनी ठरविल्यास 100% शाळा डिजिटल होवू शकतात असे सांगितले.

मा.सभापती शिक्षण व अर्थ समिती श्री.अंबरिषसिंह घाटगे म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा नेहमीच चांगल्या गोष्टींचा स्विकार करत असतो तेंव्हा मे 2017 अखेर कोल्हापूर जिल्हा 100% डिजिटल होईल.मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुणाल खेमनार यांनी शिक्षकांनी अँड्रॉइड मोबाईल, टि.व्ही. यांचा वापर अध्यापनात करावा, बदलत्या काळानुसार प्राथमिक शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे व शाळा तंत्रज्ञानयुक्त बनविणेसाठी समाज, ग्रामपंचायत यांच्या सहभागाची गरज आहे हे स्पष्ट केले. गावातील शाळेतील 100% वर्ग डिजिटल करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सत्कार जिल्हा परिषदेमार्फत करु असे आवाहन त्यांनी केले.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.सुभाष चौगुले म्हणाले, “जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद स्वनिधी व लोकसहभागामधून मोठ्या प्रमाणात शाळा डिजिटल झाल्या आहेत. उर्वरित शाळाही लवकरच डिजिटल होतील. शिक्षकांनी तंत्रज्ञान अवगत करुन त्या माध्यमातून बालकास सक्षम बनविले पाहिजे.

सदर कार्यशाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चंद्रकांत वाघमारे, सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्रप्रमुख, ग्रामसेवक व मुख्याध्यापक उपस्थित होते.सदर कार्यशाळा संपन्न करणेसाठी उपशिक्षणाधिकारी श्री.ए.जी.मगदूम, अधिक्षक (रा.प.) श्री.नलवडे, विस्तार अधिकारी शिक्षण श्री.दिपक कामत, श्री.जे.टी.पाटील, सहा. कार्यक्रम अधिकारी श्री.एस.बी.कदम व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.