पुणे विभागीय विक्री प्रदर्शन दक्खन जत्रा पुणे – २०१७

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद कोल्हापूर

पुणे विभागीय प्रदर्शन 2017

महिला स्वयंसहाय्यता समुहंानी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे पुणे विभागीय विक्री प्रदर्शन दख्खन जत्रा- पुणे 2017 दि.27 ते 31 मार्च 2017 या कालावधीमध्ये गणेश कला क्रिडामंच,  स्वारगेट, पुणे येथे आयोजित करणेत आले आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास होणेच्या उद्देशाने स्वयंसहाय्यता महिला बचत गटांची चळवळ हा एक प्रभावी मार्ग ठरला असून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनी उत्पादन केलेल्या वस्तंूना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून विभागीय प्रदर्शन प्रत्येक वर्षी  विभागातील 5 जिल्हयापैकी 1 जिल्हयामध्ये आयोजित करणेत येते त्याचा चंागला उपयोग समुहातील महिलंाना नक्कीच होतेा.

पुणे विभागीय प्रदर्शनसाठी कोल्हापूर जिल्हयातुन 10 महिला स्वयंसहाय्यता समुह पाठविणेत आलेले आहेत. त्यापैकी 3 समुह कोल्हापुरी तंाबडा/पंाढरा रस्सा तसेच कोल्हापूरी शाकाहारी/मंासाहारी जेवण तयार करतात, 1 समुह नाष्टा तयार करणेचे काम करतो. याबरोबर पेढे,बर्फी, व विविध प्रकारच्या चटण्या व गावरान कडधान्य, कोल्हापुरी चटणी मसाला, मातीची भंाडी, बेदाणे, मध, आयुर्वेदिक औषधे (मुठळा), आईल पंप/ पेस्ट कंट्रोल असे उत्पादन असलेले वस्तुचे 6 समुह पाठविणेत आलेले आहेत. /

सदर 10 समुहातील महिलंाना ॲानलाईन विक्रीसाठी मोबाईल ॲप उाऊनलोड करुन त्याचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देणेत आलेले आहे, याचा उपयोग करुन या समुहातील महिला त्यांच्या मालाची ऑन लाईन विक्रीही करु लागल्या आहेत. तसेच प्रदर्शन ठिकाणी 5 समुह मोबाईल ॲपचा वापर करत आहेत.