यशवंत पंचायत राज अभियान 2018-19 – विभागस्तरावर जिल्हा परिषद कोल्हापूर प्रथम व पंचायत समिती गडहिंग्लज द्वितीय

यशवंत पंचायत राज अभियान सन 2018-19 अंतर्गत जिल्हा परिषदेने विविध विभागाकडील योजनांची स्वयं मुल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साध्याच्या आधारे विहीत नमुन्यामध्ये प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला होता. सादर केलेल्या प्रस्तावांच्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा परिषद ही पुणे विभागामध्ये पाच जिल्हयामध्ये प्रथम क्रमांकावर आलेने मा.विभागीय आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विक्रांत बग़ाडे यांचे समितीमार्फत जिल्हा परिषद कोल्हापूर ची तपासणी दि.12/06/2019 रोजी केली होती. सदर समितीने केलेल्या तपासणी व पडताळणीमध्ये विभागस्तरावर कोल्हापूर जिल्हयाने प्रथम क्रमांक पटकविला आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अमन मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली तसेच जि.प.उपाध्यक्ष मा.सर्जेराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ रवि  शिवदास, प्रकल्प्‍ संचालक मा.अजयकुमार माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.) मा.रविकांत आडसुळ  सर्व विषय समिती मा.सभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व जिल्हा ‍परिषद खातेप्रमुख  व  अधिकारी- कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेने हे यश संपादन केलेले आहे. यानंतर जिल्हा परिषदेची राज्यस्तरीय मुल्यांकनासाठी विभागामधुन निवड झालेने लवकरच राज्य स्तरीय समिती पडताळणीसाठी येणार आहे.

तसेच पंचायत समितीने स्वयं मुल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साध्याच्या आधारे विहीत नमुन्यामध्ये प्रस्ताव मा.विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला होता. त्यानुसार विभागीय स्तरावरील निवड समिती मार्फत पंचायत समिती गडहिंग्लजची तपासणी दि.11/06/2019 रोजी केली होती. सदर समितीने केलेल्या तपासणी व पडताळणीमध्ये विभागस्तरावर पंचायत समिती गडहिंग्लजने द्वितीय क्रमांक पटकविला आहे. यासाठी पंचायत समिती सभापती व गट विकास अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समितीने हे यश संपादन केलेल आहे.

 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र)

जिल्हा परिषद कोल्हापूर