समाज कल्याण विभाग

समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या कल्याणसाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्ग, राज्य व जिल्हा परिषदेच्या स्वःनिधीमधून योजना राबविल्या जातात. सदरच्या केंद्ग व राज्य योजनाना राज्य पातळीवरुन मा. संचालक, समाज कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून अनुदान प्राप्त होते. जिल्हा परिषद स्वःनिधीच्या योजनाना जिल्हा परिषद कडून तरतुद दिली जाते.

या विभागामार्फत मागासवर्गीयांच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर समाज कल्याण अधिकारी, गट अ चे १ पद, कार्यालय अधिक्षक १ पद, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता १ पद, सहाय्यक सल्लागार १ पद, समाज कल्याण निरीक्षक ५ पदे, वरिष्ठ लिपीक २ पदे, कनिष्ठ लिपीक १ पद, शिपाई १ पद राज्य शासनाकडील कर्मचारी वर्ग असून जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक २ पदे कनिष्ठ सहायक १ पद व शिपाई २ पदे असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत.