जिल्हा परिषद स्वीय निधीमधील योजना

जिल्हयातील शेतक-याना प्राधान्याने अल्प,अत्यल्प भुधारक व मागासवर्गीय शेतक-याना खालील बाबीचे वाटप ५० टक्के अनुदनावर करणेत येते.
1) ताडपत्री
2) कडबाकुटटी यंत्र
3) फवारणी पंप
4) गांडूळकल्चर
5) सुधारीत कृषी औजारे


सुधारीत कृषी औजारे जिल्हा परिषद परिसर विकास कृषि प्रात्यक्षित व प्रशिक्षण प्रकल्प :-

  • जिल्हा परिषद इमारतीच्यार परिसरातील एकूण ३ एकर क्षेत्राच्या अतिक्रमणापासून बचाव करणे,परिसराची स्वच्ठता ठेवणे,जिल्हयातील शेतक-याना शेतीच्या सुधारीत तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षित दाखविणे,कांही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळविणे या उददेशाने जिल्हा परिषद परिसरामध्ये कृषि विभागामार्फत कृषि प्रात्यक्षिक व प्रशिक्षण प्रकल्प राबविणेत येत आहे. प्रकल्प कार्यान्वियत करताना प्रथमताः प्रक्षेत्रास तार कंपौंडसह दगडी संरक्षक भिंत बांधकाम,नाल्यावर दगडी गटर्स बांधकाम,अस्तित्वातील विहीरींची खोली वाढविणे.विंधन विहीरींची खुदाई, जंगली झाडे काढून जमिनीचे सपाटीकरण या पायाभूत सुविधा निर्माण करणेत आल्या.
    प्रकल्पांतर्गत दाखविण्यात येणारी प्रात्यक्षिके :
  • गांडूळ खत निर्मिती केंद्ग : जमिन सुपिकतेसाठी गांडूळाचे कार्य सुपरिचीत आहे. शेतक-यांनी गांडूळ खत विकत न घेता खताचे उत्पादन स्वतः सुरु करणेसाठी हे तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासह दाखविणेसाठी गांडूळ खत निर्मिती केंद्ग सुरु करणेत आले आहे.यामध्ये उत्पादीत गांडूळ खत कल्चरची विक्री रास्त भावात केली जात
  • छतावर पडणा-या पावसाच्या पाण्याची साठवणूकः भूगर्भातील पाण्याच्या अतीवापराने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. या टंचाईवर मात करणेसाठी अल्पखर्चात जलसंधारणाचे प्रात्यक्षिक दाखविण्याच्या उद्देशाने रुफ वॉटर पध्दतीने इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी विहीरीमध्ये संकलित करणेत येते./li>
  • प्रकल्पांतर्गत बाबवार प्रत्यक्ष मिळकतीचा तपशिलः सदर प्रकल्पामधून या बाबी प्रात्यक्षिक स्वरुपात जिल्हयातील शेतक-यांना दाखविणेबरोबरच जिल्हा परिषदेस काही प्रमाणात आर्थिक मिळकतही मिळणे अपेक्षित आहे. प्रकल्पामधील उत्पादित गांडूळ खत व कल्चर तसेच रोप वाटीकेतील रोपे यांच्या विक्रीमधून वर्षवार मिळालेली आर्थिक मिळकत खालिलप्रमाणे
अ.न.वर्षेप्राप्त रककम
२००३-०४१५९०३०
२००४-०५४३३२६८
२००५-०६३४६९८६
२००६-०७३०३१५५
२००७-०८१७२५८५
२००८-०९२२५६२३
२००९-१०४१६०९३
२०१०-११६२६८६९
एकूण२६८३६०९

प्रकल्पासाठी किमान कर्मचारी वर्ग व मजुरांचा वापर करणेत येत असून जिल्हा परिषदेच्या या प्रात्यक्षिक प्रकल्पास जिल्हयातील अनेक पदाधिकारी,मान्यवरांनी ,अधिकारी,प्रगतशील शेतकरी यांनी भेटी दिल्या असून जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची प्रशंसा केलेली आहे.