गुढी पाडवा पट नोंदणी २०१७

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जि. प च्या शाळांमध्ये राबविणेत आलेल्या “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सर्वेक्षणानुसार आढळलेल्या दाखलपात्र (6+) वयोगटातील जवळपास 68 टक्के बालकांची पटनोंदणी गुढी पाडव्या दिवशीच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा नजीकच्या कालावधीत विद्यार्थी संख्येने समृध्द होण्याची आशा निर्माण झाली आहे.

सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांमार्फत पटनोंदणीचे सर्वेक्षण करणेत आले. या सर्वेक्षणामध्ये 6+ वयोगटातील दाखलपात्र मुले 15151 मुली 13179 अशी एकूण 28330 बालके आढळून आली. त्यापैकी गुढी पाडव्या दिवशीच 9968 मुले 9182 मुली अशी एकूण 19150 बालके जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झालेली आहेत. तसेच दाखलपात्र वयोगटातील उर्वरित बालके शैक्षणिक सत्र सुरु होईपर्यंत जि. प च्या शाळांमध्येच दाखल होणे अपेक्षित आहे. “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” कार्यक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये यशस्वी होणेकामी पदाधिकारी, अधिकारी व शिक्षक यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत मागील तीन वर्षांपासून “गुढी पाडवा – शाळा प्रवेश वाढवा” हा अभिनव उपक्रम राबविणेत येतो. गतवर्षीपेक्षाही या उपक्रमास यावर्षी चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो. यावर्षी जिल्हा परिषद शाळांमार्फत दाखलपात्र बालकांच्या गृहभेटी, शाळांची रंगीत जाहिरात पत्रके, दुरध्वनी व एस.एम.एस.व्दारे पालकांचे उद्बोधन अशा पद्‌धतीने व्यापक जनजागृती करणेत आली. याशिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविणेत येणा-या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शालेय कामात समाजाचे सहकार्य वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल होणाऱ्या बालकांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार तसेच तज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करावे असे आवाहन करणेत येत आहे.

अ. क्र.गटाचे नंावसर्व्हेक्षणानुसार 6+ वयोगटातील दाखलपात्र संख्या  पैकी गुढीपाडव्यादिवशी  दाखल  विद्यार्थी संख्यादाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी)
मुलेमुलीएकूणमुलेमुलीएकूण
1आजरा513488100136837073873.73
2भुदरगड7466651411667622128991.35
3चंदगड100710642071844895173983.97
4गडहिंग्लज9778611838623535115863.00
5गगनबावडा25522948424121745894.63
6हातकणंगले213218553987777724150137.65
7कागल137011192489963810177371.23
8करवीर27062135484115421331287359.35
9पन्हाळा15211341286211241054217876.10
10राधानगरी1428121026381080951203176.99
11शाहुवाडी107710292106979929190890.60
12शिरोळ141911832602760744150457.80
 एकूण151511317928330996891821915067.60

Leave a Comment