*समावेशित शिक्षण योजना सन 2016-17 (दिव्यांग बालकासाठी)*

 

कोल्हापूरजिल्हापरिषद सर्व शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित शिक्षण योजना (विशेष गरजाधिष्ठित (दिव्यांग) बालकांसाठी) राबविली जात आहे. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ दि. ०१/०४/२०१० पासून अंमलात आला आहे. या अधिनियमातील प्रकरण-२, भाग-३ (२) नुसार नमूद असलेल्या अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अन्वये प्रकरण क्र. ५ मधील कलम २६ अ नुसार राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांना प्रत्येक विशेष गरजा असणाऱ्या बालकांना वयाच्या १८ वर्षापर्यंत सुयोग्य व संचारमुक्त वातावरणात नियमित विद्यार्थ्यासोबत शिक्षणाच्या समान संधी देवून मुख्य प्रवाहात आणणे व त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. विशेष गरजा असणाऱ्या अंशत: अंध, पूर्णत: अंध, कर्णबधिर, मतिमंद, अस्थिव्यंग, वाचादोष, बहुविकलांग, सेरेबल पाल्सी, अध्ययन अक्षमता, स्वमग्न या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार गरज विचारात घेवून त्यांना शिक्षणाच्या नियमित प्रवाहात समावेशित करणेसाठी येणाऱ्या समस्येवर उपाययोजना करुन त्यांना  शैक्षणिक सहाय्यभूत सेवा उपलब्ध करुन देवून शाळेत टिकवून ठेवण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे. सदरचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या सूचनेनुसार पुढीलप्रमाणे उपक्रम राबविणेत आलेले आहेत.

औपचारिक कार्यात्मक वैद्यकीय निदान व उपचार शिबिरांचे आयोजन करुन गरजेनुरुप फिजिओथेरेपी, मानसशास्त्रीय शैक्षणिक मूल्यमापन, श्रवण मूल्यमापन, मूल्यमापन शिबिर (मोजमाप), शस्त्रक्रिया पूर्वतपासणी शिबिर यांचे आयोजन करुन शस्त्रक्रिया, साहित्य साधने निश्चिती व समुपदेशन / मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

शस्त्रक्रिया-

अ.                    क्रछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर व ग्रामीण रुग्णालय ठिकाणी झालेल्या शस्त्रक्रियाजे. जे व इतर ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केलेल्याजे. जे व इतर ठिकाणी झालेल्या शस्त्रक्रिया
अस्थिव्यंगनाक, कान, घसा (ENT)नेत्रदोषअस्थिव्यंगनाक, कान, घसा (ENT)नेत्रदोषअस्थिव्यंगनाक, कान, घसा (ENT)नेत्रदोष
९६१२४२७०७०४०३०१०२०१


साहित्यसाधने-

                        मोजमाप शिबिरामध्ये ५६५ विद्यार्थ्यांना ७३८ साहित्य साधने निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी १५८ कॅलिपर फिटमेंट करणेत आलेली आहेत. डायसी प्लेअर, ब्रेलकिट, स्मार्ट केन, एम.आर.किट, व्हिलचेअर, रोलेटर, ट्रायसिकल, श्रवणयंत्र, क्रचेस या कार्यालयाकडे प्राप्त झालेले आहेत. सदर साहित्याचे वाटप मोफत करणेत येणार आहेत.

 

ब्रेलबुक व लार्ज प्रिंट –

                        पाठ्यपुस्तकावर आधारित दृष्टिहिन विद्यार्थ्यांनासाठी  ब्रेललिपीतील (ब्रेलबुक) ९४ व अंशत: अंध विद्यार्थ्यांसाठी  ठळक अक्षरातील (लार्ज प्रिंट) २०३पुस्तकांच्या संचाचा पुरवठा करणेत आलेला आहे.

 

मदतनिस भत्ता –

                        अतितीव्र स्वरुपातील विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणेकरिता प्रतिमहिना रु.२५०/- या प्रमाणे १० महिन्याचे रक्कम रु. २,५००/- याप्रमाणे १२५० विद्यार्थ्यांना याचा लाभ देणेत आलेला आहे.

 

प्रवासभत्ता

घरापासून शाळेचे अंतर जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना रु.२५०/- या प्रमाणे १० महिन्याचे रक्कम रु. २,५००/- याप्रमाणे १६० विद्यार्थ्यांना याचा लाभ देणेत आलेला आहे.

 

 

पालक प्रशिक्षण –

                        विशेष गरजाधिष्ठित बालकांसाठी सुरु असणाऱ्या सेवासुविधा त्यांच्या अडचणी व पालकांची जबाबदारी याकरिता गटस्तरावर माहे डिसेंबर २०१६ व जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये पालक प्रशिक्षण आयोजित करणेत आले होते.

 

फिजिओ थेरेपीसेवा –

                        विशेष गरजाधिष्ठित सेलेबलपाल्सी, बहुविकलांग, मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गातील बालकांना फिजिओथेरेपी देणेत येत आहे.

 

मानसशास्त्रीय शैक्षणिक मूल्यमापन –

                        विशेष गरजाधिष्ठित बालकांना असणाऱ्या समस्यांचे निराकारण करणेकरिता व अध्ययन सुलभ होणेसाठी सदर मुलांचे मानसशास्त्रीय शैक्षणिक मूल्यमापन करणेत येत आहे.

 

 

 

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर

Leave a Comment