आरोग्य विभाग

ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरिता आरोग्य विभागा मार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा दिल्या जातात. कुटूंब कल्याण कार्यक्रमापासून ते साथरोग नियंत्रण कार्यक्रमापर्यंन्त वेगवेगळया राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावरुन केली जाते. गावपातळीवर आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून आरोग्य सेवेचे कामकाज करतात तसेच आरोग्य शिक्षण सुध्दा देतात. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यमांतर्गत अपेक्षित लाभार्थींना सेवेसाठी प्रवृत्त करतात व आवश्यकते नुसार योग्य ठीकाणी संदर्भ सेवा देतात.

सर्वासाठी आरोग्य हे जागतीक आरोग्य संघटनेचे ध्येय गाठण्यासाठी वैधकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत लोकसहभागातुन ग्रामिण भागातील जनतेला सातत्याने गुणात्मक सेवा देत असतात.
१. प्राथमिक आरोग्य केंद्गे ७४
२. प्राथमिक आरोग्य उपकेंद्गे ४१३
३. ग्रामीण रुग्णालये १८
४. उप जिल्हा रुग्णालये २

वेगाने वाढणार्‍या लोकसंख्या नियंत्रण ठेवणेकरिता राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम आपल्या देशात १९५२ पासून राबविणेत येत आहे.या कार्यक्रम अंतर्गत दोन मुलांमध्ये अंतर ठेवणे करिता पाळणा लांबविण्याच्या तात्पुरत्या पध्दती उदा-तांबी,गर्भनिरोधक गोळया,निरोध,तांतडीच्या गोळया, (इमर्जन्सी पिल्स) इ साधने उपलब्ध असून पाळणा थांबविणेसाठी टाका व बिनटाका या स्त्रीशस्त्रक्रिया व बिनटाका व पारंपारिक पध्दतीच्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.

Read more

भारत सरकारने समाजातील गरीब, जोखमीच्या व दारीद्रय रेषेखालील लोकांना परिणाम कारक सेवा पुरविणेसाठी तसेच माता मृत्यू, अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे व एकुण जनन दर कमी करणे यासाठी सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM-National Rural Health Mission) ची स्थापना केली आहे. त्याचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हयामध्ये जिल्हा आरोग्य अभियान ची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व आरोग्य संबधित इतर कार्यक्रम यांच्या मधील समन्वय तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसायीक व सेवाभावी संस्था यांचा सहभाग घेऊन आरोग्याचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे हे अभियानाचे प्रमुख ध्येय आहे.

Read more

1योजनेचे नांव30 वर्षे वयावरील महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदरस्या आरोग्य महिला अधिकारी/कर्मचारी यांची गर्भाशय मुख कॅन्सर स्तनकॅन्सर मुख कॅन्सरची तपासणी करणे
2योजनेचा उदेश सविस्तर उदेश नमुद करावा30 वर्षे वयावरील महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदरस्या आरोग्य महिला अधिकारी/कर्मचारी यांची गर्भाशय मुख कॅन्सर स्तनकॅन्सर मुख कॅन्सरची तपासणी करणे
3म जि प व प स अधिनियम 1961 मधिल कलम 100 अन्वये निश्चित केलेली अनूसूचि पहीली मध्ये समावेशा बाबत विभाग प्रमूखाचे अभिपा्‌रय  सदरच्या योजनेमूळे   30 वर्षावरील   मिहिला अधिकारी कर्मचारी यांची लवकरात लवकर कॅन्सर तपासणी करुन लवकर निदान झालेने  कॅन्सर लवकरात लवकर बरा होतो
4अनूसुचि पहिली मध्ये समावेश नसल्यास काय कार्यवाही करण्यात येणारसदर योजनेचे महत्व विशद करुन समावेश नसलेस करणे बाबत कार्यवाही करणेत येईल
5शासनस्तरावर अशि योजना राबविण्यात येते का त्या बाबत सविस्तर अभिप्राय--
6योजनेची मागिल वर्षामधिल फलश्रति अहवालतपासणी केलेले पदाधिकारी -45,तपासणी केलेल अधिकारी-339,तपासणी केलेल्या आशा 978 तपासणी केलेले इतर महिला 609 एकूण तपासलेल्या  महिला पैकि प्रयोगशाळा तपासण्या - पॅपस्मॅअर 85 एफएनसी 4 मॅमोग्राफी 16 बायोप्सी 0 कर्करोग निदान -21
7योजना सन 2018-19 मध्ये कार्यान्वीत का करावी1 कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचारने बरा होण्यास मदत होते 2 राष्टिय असंसर्गजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमास बळकटि येणार आहे 3स्त्रीयांचे आरोग्यश् सुधारण्यास मदत
8योजनेचे लाभार्थि पात्रता निकश30 वर्षे वयावरील महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदरस्या आरोग्य महिला अधिकारी/कर्मचारी यांची गर्भाशय मुख कॅन्सर स्तनकॅन्सर मुख कॅन्सरची तपासणी करणे
9योजनेची लाभार्थि निवड पध्दती प्रक्रिया स्वरुप व अतिंमीकरण  प्रा आ केंद्र व तालूका आरोग्य अधिकारी    
10योजनेमध्ये लाभार्थ्याना लाभाचे स्वरुप1 कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचाराने बरा होण्यास मदत होते 2 राष्टिय असंसर्गजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमास बळकटि येणार आहे 3स्त्रीयांचे आरोग्य सुधारण्यास मदत
11योजना अम्म्ल बजावणीचे टप्प्‌ेप्राथमिक आरोग्य केंद्र  व तालूका आरोग्य अधिकारी
12योजना राबविण्याचा कालावधि सन 2017-18
13योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास योग्य असल्या बाबतचे अभिप्राय1 कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचाराने बरा होण्यास मदत होते 2 राष्टिय असंसर्गजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमास बळकटि येणार आहे 3स्त्रीयांचे आरोग्य सुधारण्यास मदत
14योजना राबविण्यास आवशक निधी रक्कम रु 300,000/- तिन लाख
15निधी बाबत समर्थनिय अभिप्रायसदरचा निधी तज्ञ मानधन, उपचार ,औषधे खरेदि कार्यक्रम आयोजन इ साठी खर्च करणेत येतो
16निधी कोणत्या महिन्यामध्ये खर्च होणारमंजूर निधी ज्या वर्षात करणेत आला त्याच वर्षि खर्च करणेत येणार
 
1योजनेचे नांवतपासणी आरोग्याची ज्येष्टांच्या सन्मानाची  आधारवड 60 वर्षावरील  नागरींकाची वैदयकिय तज्ञामार्फत तपासणी करणे
2योजनेचा उदेश सविस्तर उदेश नमूद करावाजिल्हा परिषद अतंर्गत ग्रामीन भागातील सर्व जेष्ट नागंरीकांची  स्त्री /पुरुष संभाव्यस विविध आजारंाची तज्ञ वैदयकिय पथकामार्फत वैदयकिय  तपासणी व प्रयोगशाळा तपासणी करणेत येणार आहे.
3म जि प व प स प अधिनियम 1961 मधिल कलम 100 अन्वये निश्चित केलेी अनूसुचि पहिलीमध्ये समावेशा बाबत विभाग प्रमुखाचे अभिप्राय सदरची योजना हि ग्रामीण भागातील सर्व 60 वर्षावरील स्त्री व पुरुष  यांची वैदयकिय तज्ञांच्या मार्फत तपासणी करुन  लवकरात लवकर निदान करुन औषोधोपचार करणेत येणार आहे
4अनूसूचि पहिली मध्ये समावेश नसल्यास काय कार्यवाहि करणेत येणारसदर योजनेचे महत्व विशद करुन सदरची योजना वयोवध लोकंाच्यामध्ये किती महत्वाची आहे  हे पटवून देणार
5शासन स्तरावर अशि योजना राबविण्यात येते का त्या बाबत सविस्तर अभिप्राय--
6योजनेची मागिल वर्षामधिल फलश्रति अहवालतपासणी केलेले पदाधिकारी -45,तपासणी केलेल अधिकारी-339,तपासणी केलेल्या आशा 978 तपासणी केलेले इतर महिला 609 एकूण तपासलेल्या  महिला पैकि प्रयोगशाळा तपासण्या - पॅपस्मॅअर 85 एफएनसी 4 मॅमोग्राफी 16 बायोप्सी 0 कर्करोग निदान -21
7योजना सन 2018-19 मध्ये कार्यान्वीत  का करावीज्येष्ठा आरोग्यात सुधारणा ज्येष्टांच्या वयोमर्यादेत वाड आरोग्य सेवेच्या कक्षात वाढ
8योजनेचे लाभार्थि पात्रता निकश60    वर्षावरील सर्व स्त्री व पुरुष
9 योजनेची लाभार्थि निवड पध्दती प्रकिया स्वरुप व अतिंमिकरण प्रा आ केद्र, तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय 60 वर्षावरील सर्व स्त्री पूरुष
10योजनेमध्ये लाभार्थाना लाभाचे स्वरुपसर्व 60 वर्षावरील स्त्री व पुरुष  यांची वैदयकिय तज्ञांच्या मार्फत तपासणी करुन  लवकरात लवकर निदान करुन औषोधोपचार करणेत येणार आहे
11योजना अमंलबाजावनीचे टप्प्‌ेप्रा आ केद्र, तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय
12योजना राबविध्याचा कालावधि ज्या त्या सालामध्ये
13योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास योग्य असल्या बाबतचे अभ्रिपायसदरची योजना हि ग्रामीण भागातील सर्व 60 वर्षावरील स्त्रि व पूरुष यांच्या आरोग्यात सुधारणा ज्येष्ठांच्या वयोमर्यादेत वाड आरोग्य सेवेच्या कक्षात वाढ
14योजना राबविण्यास आवशक निधी600,000/-    सहा लाख रु फक्त
15निधी बाबत समर्थनिय  अभ्रिपायसदरच्या निधी मधून तज्ञंाचे मानधन औषोधोपचार प्रयोगशाळा तपासणाी संदर्भ सेवा  शिबीर नियोजन इ साठी खर्च करणते येणार
16निधी कोणत्या मन्यिामध्ये खर्च होणारशिबीर घेतल्यानंतर फेब्रवारी किंवा मार्च मध्ये खर्च पडनार
 
1योजनेचे नांवअधिकारी ,कर्मचारी यांचा प्रात्साहनपी सत्कार करणे
2योजनेचा उदेश सपिवस्तर उदेश नमूद करावाआरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा उत्कृष्ट कामाबदल जाहीर सत्कार करण्याचे प्रोत्साहन मिळाल्याने भविषात उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहन मिळेल
3 म जि प व प स अधिनियम 1961 मधिल कलम 100 अन्वये निश्चित केलेली अनूसूचि पहिली मध्ये समावेशा बाबत विभाग प्रमूखाचे अभिप्रायआरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा उत्कृष्ट कामाबदल जाहीर सत्कार करण्याचे प्रोत्साहन मिळाल्याने भविषात उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहन मिळेल
4अनूसूचि पहीलीमध्ये समावेश नसल्यास काय कार्यवाही करण्यात येणारसदर योजनेचख्‌े महत्व पटवून देवून कर्मचारी  अधिकारी यांच्या कार्यात वाढ करणे प्रात्साहनपर बक्षिस देण इ साठी सदरची योजना राबविणे आवशक आहे असे वाटते
5शासनस्तरावर अशि योजना राबविण्यात येते का त्या बाबत सविस्तर अभिप्राय--
6योजनेची मागील वर्षामधिल फज्श्रति अहवालप्रत्येक वर्षि सदरची योजना राबविणेत येते . अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करणेत येतो व प्रमाणपत्र देणेत येते
7योजना सन 2018-19 मध्ये कार्यान्वीत का करावीआरोग्य सेवे मध्ये उत्कृष्ठ काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या कक्षेत वाठ व गूणात्मक कामाचा उठाव
8योजनेचे लाभार्थि पात्रता निकष जे अधिकारी कर्मचारी ज्या त्या वर्षात उत्कष्ठ काम करतात वार्षिक अहवाल डिएचआयएस 2  व एम सि टी एस असे निकश लावनेत येतात
9योजनेचे लाभार्थि निवड पध्दती प्रकिया स्वरुप व अतिंमिकरणप्रा.आ.केंद्र, तालूका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयजि प कोल्हापूर  
10योजनेमध्ये लाभार्थ्याना लाभाचे स्वरुप मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देणेत येतात
11योजना अमंलबाजावणीचे टप्पे प्रा आ केंद्र तालूका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय
12योजना राबविण्याचा कालावधिमंजूर कालावधी ज्या त्या वर्षात
13योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास योग्य असल्याबाबतचे अभ्रिपायअधिकारी कर्मचारी यांचा कामाबददल मान्यवरांचे हस्ते जाहीर सत्कार कम्ेलेने काम करणेस प्रोत्साहन मिळेल व गुणात्मक काम होईल तसेच संघ भावनेची कार्य संस्कृती जोपासली जाणार आहे.
14योजना राबविण्यास आवशक निधीरक्क्म रु 25,000/-
15निधी बाबत समर्थनिय अभ्रिपायस्मति चिन्ह, प्रमाणपत्र, अल्पोपहार,हॉल भाडे इ साठी खर्च
16निधी कोणत्या महिन्यसामध्ये खर्च होणारफेब्रवारी किंवा मार्च मध्ये कार्यक्रम झालेनंतर
   
प्रस्तावना भारत सरकारने गलगंड या कार्यक्रमाचे नाव 1992 नंतर आयोडिन न्युनता विकार नियंञण कार्यक्रम असे ठेवले आहे. आयोडिन हे महत्वाचे सुक्ष्म घटक आहे व ते शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. तसेच ते थायरॉईड हार्मोन तयार करणे कामी आवश्यक आहे. रोज 150 मायक्रोग्रॅम ची शरीराला गरज असते. आयोडिन हे पाणी, मासे, समुद्रातील अन्ना‍मध्ये मिळते. आयोडिनचे प्रमाण हे पर्वताजवळ, पर्वतावरुन येणा-या पाण्यात कमी प्रमाणात असते. आयोडिन कमी झाल्यामुळे खालील विकार संभावतात
  1. गलगंड
  2. शारीरिक व मानसिक वाढ कमी होणे
  3.  उंची कमी होणे
  4. उंची जास्त होणे
  5. गर्भपात होणे सारखे आजार उदभवतात
महाराष्ट्र राज्याची रुपरेषा महाराष्ट्र् राज्यात गलगंड कार्यक्रम हा मध्यवर्ती आरोग्य समितीच्या् मार्गदर्शक सुचनेप्रमाणे खालील हेतुने दिला आहे.
  •        गलगंड सर्वेक्षण करणे
  •        आयोडिनयुक्तश मिठाची निर्मीती करणे
  •     आयोडिनयुक्‍त मिठाचा वापर करणे
  •  साधे मिठ वापरण्‍यावर बंदी आणणे (निवडक जिल्‍हयामध्‍ये )
  • मिठामधील आयोडिनची मात्रा तपासणे
  •     आयोडिनयुक्‍त मिठाच्‍या वापरासाठी आरोग्‍य शिक्षण देणे
  •   आयोडिनयुक्‍त मिठाचे पॅकेटस नियमित आदिवासी भागात वाटप करणे.
  कार्यक्रमाची उददिष्‍टे
  •  कार्यक्रम आखणे व सर्वेक्षण करणे
  • आयोडिन युक्‍त मिठाच्‍या वापराचे शिक्षण देणे
  •  मिठाचे नमुने तपासणे
  • गलगंड रुग्णांना ओषधोपचार व सल्ला देणे
प्राथमिक आरोग्ये केंद्र व ग्रामीण रुग्णालयाचे नियमित कामकाज ग्रामीण भागातील नियमित भेटीमध्ये संशयीत रोगी शोधणे, मिठाचे नमुने तपासणे, लघवीचे नमुने जमा करणे व आयोडिन तपासणे, आरोग्य शिक्षण देणे  
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सर्व साधारण माहिती क्षयरोग हा मायकोबक्टेरियम नावाच्या जीवानूमुळे होतो. हा आजार माणसाला फार पूर्वीपासून माहीत असून प्रचीन काळी त्याला राजक्षय या नावाने संबोधले जायचे. क्षयरोग प्रामुख्याने फुप्फुसांना होत असला तरी तो शरीराच्या लसीकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंड, यासारख्या अवयवांनासुद्धा होऊ शकतो. क्षयरोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जेव्हा फुफुसाच्या क्षयरोगाने आजारी असणारी व्यक्ति शिकते किंवा खोकते तेव्हा क्षयरोगच्या जिवाणूंचा प्रसार होतो.

Read more

नावीन्यपूर्ण योजना

जि.प. स्वनिधी मधुन नाविन्यपूर्ण योजना सन 2015-16   संक्षिप्त माहिती
  • जिल्हयातील गरोदर मातांना व्हाईस मेसेज द्वारे शासकीय आरोग्य सेवेचा लाभ व मार्गदर्शनपर व्हाईस संर्दश भ्रमणध्वनीवर पाठविणे हा उद्वेश असुन सदर गरोदर मातानां या योजनेद्वारे लाभ देणे.
  • व्हाईस मॅसेज दिल्याने सदर लाभार्थी हा आपला लाभ घेण्यास दक्ष होऊन आरोग्य सेवा त्वरीत उपलब्ध करुन घेऊ शकतो.
  • सदर योजेने अंतर्गत 8 व्हाईस एसएमएस तयार करणेत आलेले असुन त्याचे रेकॉर्डीग करण्यात आलेले आहे.
  • योजनेचा लाभ देणेसाठी सद्यस्थिती मध्ये 10000 गरोदर मातांचे भ्रमणध्वनी क्रमांक सध्या एकत्रीत करण्यात आलेले आहे.
  • सदर योजना हि जिल्हा परिषद स्वनिधी मधुन असुन सदर योजनेस 25,000/- इतके प्राप्त होते 30000 गरोदर मातानां लाभ देण्यात आलेला आहे.

Read more

एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प (IDSP) विकेंद्रीत स्वरुपात राबवायचा देशांतर्गत कार्यक्रम आहे. साथ उदे्रकाच्या आधी धोक्याची सुचना देणारी चिन्हे / लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना करणे हा प्रकल्पाचा उददेश आहे. मिळालेल्या माहितीचा उपयोग रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या संनियंत्रणासाठी करुन आरोग्याची साधने, स्त्रोत जास्त परिणामकारकरित्या वापरता यावेत ही पण यामागची भुमिका आहे.

Read more

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम योजनेची कार्यपध्‍दती सहसंचालक,आरोग्‍य सेवा, (हिवताप,हत्‍तीरोग व जलजन्‍यरोग) पुणे हे राज्‍यस्‍तरावर कार्यक्रम प्रमुख आहेत व ते योजनेवर नियंत्रण ठेवतात. सहसंचालक, आरोग्‍य सेवा, (हिवताप,हत्‍तीरोग व जलजन्‍यरोग) पुणे-६ यांना सहाय्यक संचालक,आरोग्‍य सेवा (हत्‍तीरोग) पुणे व राज्‍य किटकशास्त्रज्ञ सहाय्य करतात. त्‍याचप्रमाणे प्रादेशिक स्‍तरावर सहाय्यक संचालक, आरोग्‍य सेवा,(हिवताप) व जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा हिवताप अधिकारी हे सहाय्य करतात.

Read more

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम

कुष्ठरोग हा मायको बॅक्टेरिअम लेप्री या जंतुमुळे होणारा अत्यल्प सांसर्गिक आजार आहे.

कुष्ठरोगाची संशयित लक्षणे :- न खाजणारा, न दुखणारा, बधीर चट्टा/चट्टे हातापायातील मज्जातंतू जाड व दुखर्‍या होणे. कोल्हापूर जिल्हयातील सर्व ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व शासकिय व निमशासकिय दवाखान्यात कुष्ठरोगावरील निदान व उपचाराची विनामुल्य सोय उपलब्ध आहे. कुष्ठरोगावरील बहुविध औषधोपचार नियमित घेतल्याने ( ६ महिने किंवा एक वर्ष) कुष्ठरोग पुर्णपणे बरा होतो.

Read more