स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी अभियान – जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा व लघुपट स्पर्धेचे निकाल जाहिर

 

केंद्र शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी अभियान अंतर्गत  निबंध स्पर्धा व लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता सहाय्य संस्था,यांचेकडून निर्देश देण्यात आले होते.याप्रमाणे कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत या दोन्ही स्पर्धांचे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून आयोजन करण्यात आले होते.जिल्हास्तरावर प्राप्त  निबंध आणि लघुपट यांचे परिक्षण जिल्हास्तरावर करण्यात आले असून या स्पर्धांचा निकाल जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीमध्ये दि.11/8/2017 रोजी घोषित करण्यात आला असून,या स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे –

स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी -निबंध  स्पर्धा – जिल्हास्तर निकाल
अ.क्रविजेत्या र्स्प्धकाचे नावप्राप्त क्रमांकगट
1कु.ऋ शिकेश दत्तात्रय पाटीलप्रथम क्रमांकप्रथम गट
2कु.विवेक उत्तम तळवार,मा.श्री.आण्णासाहेब डांगे कॉलेज,हातकणंगलेव्दितीय क्रमांक
3कु.काजल बबन पाटील,माध्यमिक विद्यालय,शेळोशी,गगनबावडातृतीय क्रमांक
4श्री.कपिल साताप्पा पाटील,प्रा.शिक्षक,न.पा.शिक्षण मंडळ,कागलप्रथम क्रमांकव्दितीय गट
5प्रियदर्शनी प्रकाश भोसले,हलकर्णी,ता.चंदगडव्दितीय क्रमांक
6प्रथमेश सतीश पाटील,तृतीय क्रमांक
स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी – लघुपट  स्पर्धा – जिल्हास्तर निकाल
1अरूण कृष्णा काशिद,संतमळा,इचलकरंजी,हातकणंगलेप्रथम क्रमांकव्दितीय गट
2प्रसाद महेकर,कोल्हापूरव्दितीय क्रमांक
3बी.के.पाटील,येळवण जुगाई,कोल्हापूरतृतीय क्रमांक

वरील विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरावर दोन्ही गटांसाठी प्रथम क्रमांकास रू.15हजार,सन्मानचिन्ह व पारितोषिक,व्दितीय क्रमांकास रू.10 हजार ,सन्मानचिन्ह व पारितोषिक व तृतीय क्रमांकास रू.5 हजार सन्मानचिन्ह व पारितोषिक दिले जाणार आहे.या विजेत्या स्पर्धकांची नावे,निबंध आणि लघुपट राज्यस्तरावरती सादर केली असून प्रत्येक जिल्हयातील तीन विजेत्या स्पर्धकांपैकी राज्यस्तरावर तीन विजेते निवडले जाणार आहेत.कोल्हापूर जिल्हयातून वरील सर्व स्पर्धक हे राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र ठरले आहेत.

Leave a Comment