स्वच्छता दर्पणमध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम

2 ऑक्टोबर,2017 महात्मा गांधी जयंती निमित्ताने केंद्र शासनाच्या पेयजल  व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणा-या कामांवर आधारित याचे गुणांकन केले गेले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आहे.

स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार जिल्हयाला 90 % इतके गुण मिळाले आहेत.दि.25 सप्टेंबर,2017 रोजी पर्यंत झालेल्या कामगिरीवर हे गुणांकन ठरले आहे.केंद्र शासनाकडून या स्पर्धेसाठी कामगिरी,शाश्वत्ता आणि पारदर्शकता या तीन घटकांवर आधारित जिल्हयांचे गुणांकन केले आहे.कोल्हापूर जिल्हयाला कामगिरीमध्ये 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत तसेच शाश्वत्ता या घटकासाठी 25 पैकी 15 गुण मिळाले आहेत तसेच पारदर्शकतेसाठी 25 पैकी 25 गुण मिळाले आहेत.

स्वच्छता दर्पण पुरस्कारासाठी पुणे विभागातील कोल्हापूर,सांगली व सातरा हे तीन ही जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत.या उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हयांचा 2 ऑक्टेाबर,2017 रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमावेळी गौरव केला जाणार आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग,तालुकास्तर गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी(ग्रा.पं),गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी,आणि ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसेवक आणि ग्राम पंचायत कर्मचा-यांनी मेहनत घेतली. या कामगिरीसाठी मा.शौमिका महाडीक,अध्यक्षा,जि.प.कोल्हापूर,मा.श्री.सर्जेराव पाटील,उपाध्यक्ष,जि.प.कोल्हापूर,सर्व मा. पदाधिकारी,जि.प.कोल्हापूर आणि मा.डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले.तर काम वेळेत पुर्ण करून घेण्यासाठी मा.श्रीम.सुषमा देसाई,उपमुख्य  कार्यकारी अधिकारी,पाणी व स्वच्छता,जि.प.कोल्हापूर व या विभागातील तज्ञ व सल्लागार यांनी विषेश परिश्रम घेतले.

————————————————————————————————-

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

Swachata Darpan
National RankDistrict NameState NameState RankPerformanceSustainablityTransparancyTotal Score
-50%-25%-25%
1SABAR KANTHAGujarat150152590
1SURATGujarat150152590
1DEVBHOOMI DWARKAGujarat150152590
1MAHISAGARGujarat150152590
1BHIWANIHaryana150152590
1FARIDABADHaryana150152590
1GURGAONHaryana150152590
1KANGRAHimachal Pradesh150152590
1KULLUHimachal Pradesh150152590
1MANGALORE(DAKSHINA KANNADA)Karnataka150152590
1UDUPIKarnataka150152590
1GWALIORMadhya Pradesh150152590
1KOLHAPURMaharashtra150152590
1SANGLIMaharashtra150152590
1SATARAMaharashtra150152590

 

Leave a Comment