संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती

कोल्हापूर दि ३ – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी  जिल्हयात डीजीटल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात  येणार आहे.
आज सोमवार दिनांक ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या परिसरात  डिजिटल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून  मा. अध्यक्ष, सौ. शौमिका महाडीक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती मा. श्री. सर्जेराव पाटील,  समाज कल्याण सभापती मा. श्री. विषांत महापुरे, जेष्ठ जि.प. सदस्य मा. श्री. अरूण इंगवले, श्री.विजय भोजे, श्री. हेंमंत कोलेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व. ) प्रियदर्शिनी मोरे, सर्व विभागाचे खातेप्रमुख तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षचे तज्ञ व सल्लागार  आदींची उपस्थिती होती. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने ही व्हॅन कोल्हापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे.
ही व्हॅन जिल्ह्यातील १५० गावात जाणार आहे,  डिजिटल व्हॅनद्वारे ग्राम पंचायत, शाळा, अंगणवाडी आणि महिला बचत गट यांना स्वच्छतेविषयक फिल्म दाखवण्यात येणार आहे.
राज्याच्या माहिती व जनसंपर्क  विभागाचे वतीने मुंबई येथील आर.डब्ल्यु प्रमोशन संस्थेच्यावतीने आज पासून जिल्ह्यातील १५० ग्रामपंचायती मध्ये ही व्हँन फिरणार आहे.
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने ही मोहिम आखण्यात आली आहे. शाश्वत स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, मेला गाळ व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन,  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, गटार मुक्त व शौषखड्डेयुक्त गाव अभियानाची माहिती या डिजीटल व्हॅनद्वारे ग्रामस्थांना दाखवण्यात येणार आहे.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर

दि.१ डिसेंबर 2018 रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी व जलव्यवस्थापन समितीमार्फत घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत वेंगुर्ला, जि. सिंधुदूर्ग येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अभ्यास दौऱ्यांतर्गत भेट दिली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे घनकचऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी हा अभ्यास दौरा मार्गदर्शक ठरणार आहे
नगरपरिषद वेंगुर्ला, जि. सिंधूदुर्ग येथील आदर्श घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा अभ्यासदौरा करणेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूर कडील स्थायी समिती व जिल्हा जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य यांनी दिनांक ०१. १२ . २०१८ रोजी भेट देऊन पाहणी केली. सदर अभ्यासदौऱ्यावेळी  ओल्या कचऱ्या पासून बायोगॅस युनिट, प्लास्टिक क्रशर मशीन , पाल्यापाचोळ्यापासून ब्रिकेटस निर्मिती मशीन इत्यादींची पाहणी करून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये सदरचा प्रकल्प उभारणे करिता अभ्यासदौरा करणेत आला.
या अभ्यासदौऱ्यातील समिती सदस्यांना नगरपरिषद वेंगुर्ल्याचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वैभव साबळे यांनी माहिती दिली. सदर अभ्यासदौरा समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष मा. शौमिका महाडिक,उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, बांधकाम सभापती मा. श्री. सर्जेराव पाटील पेरीडकर शिक्षण सभापती मा. अंबरीशसिहं  घाटगे, समाजकल्याण सभापती मा. विशांत महापुरे, जेष्ठ सदस्य मा. श्री. अरुण इंगवले, मा. शिवाजीराव मोरे, श्री. राजेश पाटील, व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, व लेखाधिकारी श्री. संजय कुंभार इ. उपस्थित होते.

किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षणास दि. 26.11.2018 रोजी पासून सुरूवात झाली आहे. वैयक्तिक स्वच्छतेमधील अतिशय महत्वाचा मानला जाणार विषय हा शालेय मुलींपर्यंत पोहचविणे तसेच या विषयाबाबत शास्त्रशुध्द माहिती मुलींना मिळावी. त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मासिक पाळी व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविला जात आहे.

दि. 26.11.2018 रोजी पंचायत समिती भुदरगड, चंदगड, करवीर, राधानगरी, हातकणंगले, आजरा, गगनबावडा, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये या प्रशिक्षणास सुरवात झाली आहे. तालुकास्तरीय पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.  जिल्हा स्तरावरून तालुकानिहाय प्रशिक्षण वेळापत्रक देण्यात आले आहे. यानुसार तालुकास्तरावर एकूण 2534 सहाय्यक प्रविण प्रशिक्षक हे प्रशिक्षण घेणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत यापूर्वी जिल्हास्तरावर  प्रविण प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रविण प्रशिक्षकांमार्फत तालुकास्तरीय सहाय्यक प्रविण प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात  आहे. तालुकास्तरीय  प्रशिक्षक हे प्रत्यक्ष शाळांमध्ये  6 सत्रांमध्ये मुलींना प्रशिक्षण देतील असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

प्रशिक्षणादरम्यान मासिक पाळीबाबत माहिती पुस्तिका, हॅन्डबुक आणि लॅमिनेटेड चार्ट असे प्रशिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभागामार्फत करण्यात आले आहे.

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका 

दिनांक  26/11/2018 इ. संविधान दिन  साजरा केलेबाबत.

26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 26/11/2018 रोजी सकाळी ठिक 11-00 वाजता साजरा करणेत आला. त्या प्रसंगी  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल  हे अध्यक्षतेस्थानी होते.   यावेळी मा. शिक्षण व अर्थ समिती सभापती श्री अंबरिषसिंह घाटगे, मा. प्रकल्प  संचालक सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)  रविकांत आडसुळ, उप मुख्य  कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) राजेंद्र भालेराव,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) सोमनाथ रसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, शिक्षणाधिकारी (प्राथ.) आशा उबाळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजय शिंदे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, यांच्यासह  सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

श्री. बी.पी.माळवे  सहाय्यक शिक्षक यांनी सुत्रसंचलन व भारतीय संविधाना विषयी माहिती दिली. या प्रसंगी उद्रदेश पत्रिकेचे सामुहिक वाचन करणेत आले. तसेच 26/11  च्या मुंबईवरील अतिरेकी हल्यात शहिद झालेल्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहणेत आली. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सही/-

(रविकांत आडसुळ)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

                                                                          जिल्हा परिषद, कोल्हापूर

दिनांक  19/11/2018 इ. इंदिरा गांधी  यांची जयंती  साजरी केलेबाबत.

इंदिरा गांधी यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 19/11/2018 रोजी सकाळी ठिक 11-00 वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व जिल्हा परिषद सदस्य मा. अरुण इंगवले  यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले.मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इंदिरा गांधी यांच्या बद्दल माहिती सां‍गून नव भारताच्या  सामर्थ्यात इंदिरा गांधीजींचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले या प्रसंगी राष्ट्रीय एकात्मतेची  शपथ घेणेत आली.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) रविकांत आडसुळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पू.) एम.एस. बसर्गेकर, शिक्षणाधिकारी (माध्य) किरण लोहार, जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्यासह  सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्री.बी.पी.माळवे  सहाय्यक शिक्षक यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेकामी कार्यवाही करणेत यावी, ही विनंती.

सही/-

(रविकांत आडसुळ)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

                                                                          जिल्हा परिषद, कोल्हापूर

शिक्षक समायोजन २०१८

शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत दि. 17/11/2018 इ. रोजी श्री. वसंतराव नाईक समिती सभागृह, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे माध्यमिक विभागाकडून अतिरिक्त ठरलेल्या 29 शिक्षकांपैकी 26 शिक्षकांचे जिल्हा परिषद कडील शाळांमध्ये समायोजन करणेत आले. तर उर्वरीत शिक्षकांचे मूळ शाळेत प्रत्यावर्तन करणेत आले. यामध्ये अध्यापक पदी 16, विषय शिक्षक पदी 10 शिक्षकांचे समायोजन समुपदेशनाने केले आणि उर्दू माध्यमाच्या 19 रिक्त विषय शिक्षक पदासाठी उर्दू पदवी प्राप्त अध्यापकांचे समुपदेशन घेऊन 16 अध्यापकांना विषय शिक्षक पदी पदस्थापना देणेत आली.

तसेच आंतरजिल्हा बदलीने कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे हजर झालेल्या 6 अध्यापकांना समुपदेशनाने रिक्त जागांवर पदस्थापना देणेत आली आहे.

सदर समुपदेशन प्रक्रियेसाठी शिक्षण व अर्थ समिती सभापती श्री. अंबरिषसिंह घाटगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविकांत अडसुळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीम. आशा उबाळे, विस्तार अधिकारी, अधिक्षक, कक्ष अधिकारी व सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

                                                                                श्रीम. आशा उबाळे

                                                                           शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                            जिल्हा परिषद, कोल्हापूर

जिल्हास्तरीय जागतिक शौचालय दिन व NARSS सर्वेक्षण कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना

जिल्हास्तरीय जागतिक शौचालय दिन व NARSS सर्वेक्षण कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर, मा. आर.पी. शिवदास, अति. मु.का.अ,जि.प.कोल्हापूर, मा. प्रियदर्शिनी मोरे, उप.मु. का.अ( पा. व स्व. ) जि.प. कोल्हापूर या कार्यशाळेसाठी उपस्थित सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकारी सर्व.