ग्रामपंचायत शिवणगे ता.चंदगड ग्रामसेवक यांचा सत्कार

आज दिनांक 25/04/2017 रोजी स्मार्ट ग्राम योजन अंतर्गत जि.प.कोल्हापूर कडील जिल्हास्तरीय समिती मार्फत ग्रा.प.शिवनगे ता.चंदगड ची तपासणी करण्यांत आली.त्यावेळी मा.इंद्रजित देशमुख अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.एम.एस.घुले उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), डॉ.प्रकाश पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी, मा.चंद्रकांत सुर्यवंशी जिल्हा कृषी विकास अधिकारी ,मा.प्रकाश बरगे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्री.शिंदे उपकार्यकारी अभियंता (बांध) मा.कलाप्पा भोगन जि.प.सदस्य ,श्री.मुगेरी साहेब, मा.गोपाळराव पाटील  तपासणीचेवेळी उपस्थित होते.

ग्राम पंचायती कडील कामकाज पाहून कामाचे व ग्रामसेवकाच्या कार्यशैलीचे कौतुक करुन श्री.जी.एल.पाटील ग्रामसेवक यांचा मा.इंद्रजित देशमुख अति, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सत्कार केला व समितीने अभिनंदन करुन समाधान ü व्यक्त केले.

ग्रामपंचायत शिवनगे स्थापने पासून (1956) आजतागायत बिनविरोध असले बाबत समाधान व्यक्त करुन शासना मार्फत वैशिष्ठयपूर्ण कामा बाबत पुरस्कार देणे करिता शिफारस करत असलेचे आपले मत व्यक्त केले यावेळी गावातील सरपंच ,उपसरपंच सदस्य सर्व संस्थाचे पदाधिकारी व पं.स.चे सर्व खाते प्रमुख  व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.