बंद

    परिचय

    श्री शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या व पंचगंगेच्या काठी दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या भूमीमध्ये, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या आदर्श समाज कार्याचा वारसा घेवून, कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्ह्यांतील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे.  कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील नैऋत्य पठारी भागावर उत्तर अक्षांशावर 16°42′  पुर्व रेखांशावर 74°15′ अंशावर वसला असून जिल्ह्याच्या पश्चिमेस सह्याद्रीचा कडा, उत्तरेस वारणा नदी, पूर्वेस अंशत: कृष्णा नदी व दक्षिणेस कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्हा अशा चतु:सिमा आहेत.  कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7685 चौ.कि.मी. इतके असून ते राज्याच्या क्षेत्रफळाच्या 2.5 टक्के आहे. जिल्ह्यांतून प्रामुख्याने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या नद्या वाहतात.  सन 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 38.76 लाख असून ग्रामीण भागातील लोकसंख्या 26.45 आहे. जिल्हयात 12 (डोंगरी 10 व बिगर डोंगरी 2) तालुके असून 12 पंचायत समित्या, 2 महानगरपालिका, 13 नगरपरिषदा व 1,025 ग्रामपंचायती आहेत.

    • आवास योजना – प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्याला 16656 घरकुले तसेच राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल बांधकाम कामगार आवास योजना, मोदी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेमधून तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत 35513 घरकूल मंजूर असून त्यापैकी 27951 घरकूले पूर्ण झाली आहेत, तसेच 7562 घरकूले प्रगतीपथावर आहेत.
    • उमेद अभियानांतर्गत आज अखेर 27467 इतके स्वयंसहायता समूह स्थापन करण्यात आलेले आहेत. सन 2023-24 मध्ये 11,638 गटांना रक्कम रुपये17 कोटी कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उन्नयन प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत 237 महिलांना 87.67 लक्ष इतके रक्कम कर्ज स्वरूपात वितरति करण्यात आले आहे.
    • राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन (एनआरईटीपी) या केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोल्हापूरी चप्पल क्लस्टर दि. 18-10-2022 रोजी रु. 340.85 लक्ष निधीस मंजुरी देणेत आली असून यामध्ये 240 महिला कारागीरांना समाविष्ट करुन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. राज्यामध्ये हा प्रथमच उपक्रम राबविण्यात येत असून कौशल्य कारागीरांच्या उत्पादनास रास्त भाव मिळेल व उत्पादन युनिट उदयोगामधुन त्यांच्या मालाला जास्त भाव मिळुन त्यांचे उत्पन्नात वाढ होणार आहे.
    • 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी जल जीवन मिशन योजनेची घोषणा केली.
    • सदर योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील सर्व कुटूंबांना ‘हर घर नल से जल’ अंतर्गत कार्यात्मक नळ जोडणीद्वारे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण  व 55 लिटर्स  प्रतिदिन प्रति माणसी वर्षभर शाश्वत पाणी पुरवठा करणे आहे.
    • सदर योजने अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 1270 योजनांचा रु.1475.00 कोटींचा आराखडा मंजूर असून त्यापैकी 1217 योजनांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. सदर योजने अंतर्गत सन 2054 च्या लोकसंख्येस 55 लिटर्स प्रति दिन प्रति माणसी प्रमाणे स्वच्छ पाणी पुरवठा होणेसाठी अस्तित्वातील वापरण्यायोग्य उपांगे वगळून नवीन लागणारी वाढीव क्षमतेच्या उपांगाचा समावेश करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीमध्ये 1217 योजनांपैकी 377 योजनांची कामे पूर्ण आहेत.
    • जिल्ह्यामध्ये 683789 पैकी 678908 इतक्या कुटूंबांना कार्यात्मक नळ जोडणी देण्यात आली असून ग्रामपंचायतीमार्फत उर्वरीत नळजोडणीचे उद्दिष्ट मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
    • योजनेच्या वीज बिलाचा भार कमी व्हावा, यासाठी 364 योजनांमध्ये नेट मिटरिंग सोलरचा समावेश करणेत आला आहे.
    • सौर दुहेरी पंपावर आधारित 31 योजनांचा आराखड्यात समावेश आहे. त्यापैकी 29 योजना पूर्ण असून 2 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत.
    • जिल्ह्यातील एकूण 3265 शाळा व 3961 अंगणवाड्या असून त्या सर्वांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे.
    • जिल्ह्यातील सर्व 1192 गावे हागणदारीमुक्त (ओडीएफ) झालेली आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यातील 988 गावे हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ+) झालेली आहेत.
    • प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रत्येक तालुक्याकरीता एक युनिट मंजूर करणेत आलेले आहे. सदर प्रकल्पामध्ये तालुक्यातील सर्व प्लॅस्टिक संकलन करुन शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
    • पथदर्शी गोबरधन योजनातंर्गत जिल्हास्तरीय प्रकल्प ग्रामपंचायत माणगाव ता. हातकणंगले येथे मंजूर असून या प्रकल्पामध्ये ग्रामीण भागातुन जमा होण्याऱ्या कचऱ्यापासुन वीज व सेंद्रीय खत निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
    • पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखणे या उपक्रमांतर्गत सन 2023-24 मध्ये नियोजन करुन जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये श्री गणेशमूर्ती व निर्माल्य दानाचा उपक्रम आयोजित करुन घरगुती 279723 व सार्वजनिक 2810 अशा तब्बल 282533 इतक्या श्री गणेश मूर्ती व 1424 ट्रॉली व 214 घंटागाडी इतके निर्माल्य जमा करणेत आले.