राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाची व्याप्ती शासनाने वाढवली – गोवर व रुबेला, रोटाव्हायरस लसीचा समावेश, निमोकोकल लसीचा समावेश होणार, सर्व गुणवत्तापूर्ण लसी मोफत मिळणार

राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी , 0 ते 1 वर्ष लसीकरणाचे प्रमाण वाढवून पूर्ण संरक्षित बालकांचे  प्रमाण 90 टक्के पेक्षा जास्त  करण्याचे दिनांक 24 जून 2019 रोजी  जिल्हाधिकारी मा. दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा समन्वय समिती ठरविण्यात आले आहे. सदर सभेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) मा श्री भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) मा श्री रसाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहय संपर्क) सी.पी.आर. डॉ हर्षला वेदक,  शासकीय वैद्यकीय महाविद्यलयातील बाल रोग तज्ञ डॉ सरवदे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ फारुख देसाई , वैद्यकीय अधिकारी म.न.पा. कोल्हापूर डॉ अमोल माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ स्मिता खंदारे, तसेच शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिक चे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाची सभेमध्ये माहिती देतांना डॉ देसाई म्हणाले की, कोल्हापूर जिल्हयाचे बालकाचे लसीकरणाचे उदिदष्ट 62 हजार , गरोदर माता उदिदष्ट 68 हजार असून सर्व माता व बालक यांचे लसीकरण करण्यासाठी जिल्हयामध्ये एकुण 22 हजार लसीकरण सत्र आयोजित करण्यात येतात. गुणवत्तापूर्ण लसीची  साठवणूक व वितरण  करण्यासठी  जिल्हयात  109 कोल्ड चेन पॉईट आहेत. लसीकरणाव्दारे  नऊ धोकादायक आजारापासून संरक्षण मिळत आहे. सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रमामुळे  सन 2014 साली भारत पोलिओ मुक्त झाला, सन 2015 साली माता व नवजात बालकातील धर्नुवात दूरीकरण करण्यात यश मिळाले आहे. कार्यक्रमाचा वेळोवेळी आढावा घेवून सन 2011 साली पाच लस एकत्र करुन पेन्टाव्हॅलन्ट लस,  सन 2015 इनॲक्टीवेटेड पोलिओ,  साली सन 2016 रोटाव्हायरस, सन 2017 साली गोवर रुबेला आणि  निमोकोकल कॉन्जुगेट लस या लसीचा समावेश करुन बाल मृत्यू कमी यश मिळावले आहे.  गरोदर माता व 10, 16 वर्ष मुलांना धर्नुवात लसी ऐवजी  धर्नुवात व घटसर्प या दोन लसी (Td)देण्यात येत आहेत

वयसुधारित राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक विभागपुर्ण संरक्षित बालकांचे लसीकरण  2018-19
उदिदष्ट साध्यटक्के
  जन्मत:BCG,  OPV-0, Hepatitis B birth doseजि.प.451454014289
6 आठवडेOPV-1, Pentavalent-1, fIPV-1, Rota-1 and PCV-1म.न.पा.8091745392
10 आठवडेOPV-2, Pentavalent-2  & Rota-2न.पा.9223736480
14 आठवडेOPV-3, Pentavalent-3, fIPV-2,  Rota-3  and  PCV-2खाजगी2135
9-12 महिनेMR-1,  JE1 * ,  DPT Booster, PCV-Boosterएकुण621695709491
16-24 महिेनेMR-2,  JE2 * ,  DPT Booster1, PCV-Boosterमातेला व पालकांना 4 महत्वाचे संदेश

1.        कोणती लसी दिली व कोणत्या आजारापासून संरक्षण.

2.        पुढील डोसची तारीख , वार व ठिकाण सांगा

3.        लसीकरणनंतरच्या किरकोळ प्रतिक्रिया यांची माहिती.

4.        लसीकरण कार्ड संभाळून ठेवणे व घेवून येणे

5-6 वर्षDPT Booster2
10 वर्षTd
16 वर्षTd
गरोदर माताTd  1,2  or Td Booster

जिल्हयातील 1 वर्षाच्या आतिल बालकांनासर्व प्रकारच्या लसी वेळेत देवून पूर्ण संरक्षीत बालकांचे लसीकरणाचे प्रमाण सुधारणा होण्यासाठी  Immunization Coverage Improvement Plane (i-CIP) नुसार आढावा पध्दतीचे सक्षमीकरण अंतर्गत दर महा वैद्यकीय अधिकारी,  आरोग्य कर्मचारी यांची  लसीकरण संबधी प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून मासिक तसेच त्रैमासिक सभेमध्ये लसीकरण कामाचा आढावा घेण्यात येणार आहे.  सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक  यांना लसीकरण सत्राचे पर्यवेक्षणसाठी राज्यस्तरावरुत सुधारीत पर्यवेक्षण सुची करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ट्रॅकींग बँग तयार करणे, चार संदेश असणारे पोस्टर्स तयार करणे इ कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ग्रामस्तरावर आरोगय सेविका, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका (AAA- ANM, AWS, ASHA)  यांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहुन कार्यक्षेत्रातील मुलांचे वेळेत 100 टक्के लसीकरण होण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना या सभेमध्ये मा. जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.  वरील वेळापत्रकानुसार पालकांनी आपल्या 1 वर्षाच्या आतील बालकांचे  वेळेत व मोफत लसी नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत जावून दयावेत असे अहवान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे यांनी केले.  आभार डॉ देसाई यांनी मानले.

जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्हा परिषद कोल्हापूर

Leave a Comment