जिल्ह्यातील ३ ग्राम पंचायतीना जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत  ई- कार्ट घंटागाडी

जिल्ह्यातील ३ ग्राम पंचायतीना जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत  ई- कार्ट घंटागाडी

(सामाजिक उत्तरदायित्व धोरणअंतर्गत रत्नाकर बँक लिमिटेड यांचेमार्फत स्वच्छता कार्यात योगदान  )

कोल्हापूर : दि. ५. ०२.२०१९

 

             सामाजिक उत्तरदायित्व धोरण अंतर्गत रत्नाकर बँक लिमिटेड  यांचेकडून प्राप्त निधीतून जिल्हा परिषद कोल्हापूर पाणी व स्वच्छता विभागा मार्फत जिल्ह्यातील ग्राम पंचायत दिंडनेर्ली, ग्राम पंचायत चिंचवाड ता. करवीर तसेच  ग्राम पंचायत जैन्याळ, ता. कागल या तीन ग्राम पंचायतींना कचरा संकलनासाठी प्रत्येकी एक ई कार्ट घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली .

     या ई कार्ट वाहनाचे आज ग्राम पंचायतीना वितरण  करण्यात आले . या कार्यक्रमासाठी मा. सौ . शौमिका महाडिक , अध्यक्ष जि  प. कोल्हापूर, मा. आमदार श्री. अमल महाडिक, मा. श्री सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष, जि .प. कोल्हापूर, मा सौ संध्याराणी बेडगे, जि .प. सदस्य, मा. श्री. हेमंत कोलेकर,जि.प.सदस्य, मा श्री. शिवाजी मोरे,जि.प.सदस्य, मा. श्री बंडा  माने, जि.प.सदस्य, मा. सौ स्वरुपाराणी जाधव,जि .प. सदस्य, मा. सौ. राणी खमलेट्टी जि .प. सदस्य मा. श्री. आर पी. शिवदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी, मा. श्री. संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा . व स्व .), श्री . निशांत कांबळे, समाजशास्त्र तज्ञ्   तसेच सर्व खातेप्रमुख, रत्नाकर बँक लिमिटेड चे प्रतिनिधी व संबंधित ग्राम पंचायतींचे सरपंच, ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्राम सेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

          मा. सौ . शौमिका महाडिक , अध्यक्ष जि  प. कोल्हापूर यांच्या प्रयत्नातून कचरा संकलनासाठी घंटागाडी  रत्नाकर बँक लिमिटेड यांचेकडून मिळाली आहे . यासाठी प्रति घंटागाडी   रु. २ लक्ष,४५ हजार असा एकूण ७ लक्ष, ३५ हजार इतका खर्च आला असून सदर  घंटागाडी हि चार्जेबल बॅटरीवर चालणारी असल्याने पर्यावरणपूरक आहे. तसेच या घंटागाडीला ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याची व्यवस्था आहे . सदर घंटागाड्यांचे ग्राम पंचायतींना वितरण करून संबंधित ग्राम पंचायत कर्मचा  घंटागाडी चालविण्याचे तसेच देखभाल दुरुस्तीचे तज्ञाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे .

आरटीई २५ % अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता राज्यातील सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील शासनाने निर्धारित केलेल्या वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामधील पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीसाठी 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन राबविणेत येणार आहे.

सदर प्रवेश प्रक्रिया खालील वेळापत्रकाप्रमाणे राबविणेत येणार आहे.

अ.क्र. कालावधी करावयाची कार्यवाही
1 13/02/2019 ते 22/02/2019 आर.टी.ई. प्रवेशपात्र सन 2018-19 च्या Auto Forward केलेल्या शाळांचे आणि नवीन नोंदणी केलेल्या शाळांचे BEO कडून Verification करणे.
2 25/02/2019 ते 11/03/2019 सामाजिक वंचित घटक / आर्थिक दुर्बल घटक / घटस्फोटीत तसेच विधवा महिला / अनाथ बालके / दिव्यांग बालके इ. घटकांतील पालकांकडून ऑनलाईन प्रवेश अर्जभरणे.
3 14/03/2019 ते 15/03/2019 पहिली सोडत (लॉटरी) काढणे.

 

वरील वेळापत्रकानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी (अल्पसंख्यांक शाळा वगळता) ऑनलाईन नोंदणी करावी व पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केलेले आहे.

 

 

                                                                शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                                        जिल्हापरिषद,कोल्हापूर

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, प्रकार -4 , (मुलींचे वसतीगृह) ता.गगनबावडा जिल्हा परिषद,कोल्हापूर कडील कंत्राटी पदांची भरती – सन 2018-19

समग्र  शिक्षा अभियान अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, प्रकार -4 , (मुलींचे वसतीगृह) ता.गगनबावडा जिल्हा परिषद,कोल्हापूर कडील कंत्राटी पदांची  भरती –  सन 2018-19

26 जानेवारी 2019  प्रजासत्ताक दिन साजरा केलेबाबत.

26 जानेवारी 2019 प्रजासत्ताक दिनाचा 69 वा वर्धापन दिन जिल्हा परिषद, कोल्हापूर मुख्यालयाच्या प्रांगणात मा. शौमिका अमल महाडिक अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांचे हस्ते सकाळी 08.00 वाजता ध्वजारोहण करुन साजरा करणेत आला. या प्रसंगी मा.श्री. अमन मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.श्री. सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष, मा.श्री. अंबरिषसिंह घाटगे, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, मा. श्री. विशांत महापुरे, सभापती समाज कल्याण समिती,मा. सौ. वंदना मगदुम, सभापती महिला बाल कल्याण समिती, मा.श्री. सुभाष सातपुते,जि.प.सदस्य मा.श्री. रवि शिवदास अति.मु.का.अ., मा. सौ. सुषमा देसाई, प्रकल्प संचालक, मा. श्री. रविकांत आडसुळ, उप मु.का.अ. (सा.प्र), मा.श्री. राजेंद्र भालेराव, उप मु.का.अ(ग्रा.प.), मा.श्री. सोमनाथ रसाळ, उप.मु.का.अ (म.बा.क.), मा.सौ.प्रियदर्शिनी मोरे, उप मु.का.अ (पा.व स्व.), मा.श्री. संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मा.श्री. तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, मा.डॉ. योगेश साळे जिल्हा आरोग्य अधिकारी, मा.सौ.आशा उबाळे, शिक्षणाधिकारी (प्राथ), मा.श्री. किरण लोहार, शिक्षणाधिकारी (माध्य.)  मा. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, (कृ.वि.अ.), मा.डॉ. संजय शिंदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, मा.श्री. राहूल कदम  उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व इतर सर्व अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आरोग्य विभाग जिल्हा परिषदमार्फत तबाखु मुक्त परिसर व कार्याल  शपथ देणेत आली व गोवर व रुबेला रथाचे उद्रघाटन करणेत आले तसेच वित्त विभागामार्फत जिल्हा परिषदेची सन 2019 ची डायरीचेही प्रकाशन मा. अध्यक्ष शौमिका महाडिक यांचे हस्ते करणेत आले.

कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेकामी कार्यवाही करणेत यावी, ही विनंती.

सही/-

(रविकांत आडसुळ)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

                                                                                     जिल्हा परिषद, कोल्हापूर

२६ जानेवारी पासून जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर वारकरी संप्रदायामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा महाजागर

कोल्हापूर : दि. १४.०१ .२०१९

 

ग्रामीण महाराष्ट्राची परंपरा  जपत वारकरी साहित्य परिषद आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेचा महाजागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन , जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत या कार्यक्रमाची नियोजन बैठक आज जिल्हा परिषद कोल्हापूर यथे आयोजित करण्यात आली होती. या नियोजन बैठकीसाठी मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, मा. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ) जि. प. कोल्हापूर, वारकरी साहित्य परिषदेच्या  मा. सौ . मालूश्री पाटील उपस्थित होत्या.

राज्याच्या  ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सहभागातून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हा ध्वजांकित कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत सद्यस्थितीस उपलबध सुविधांचा नियमित वापर, ग्रामीण कुटुंबाकडून स्वच्छता सवयीचा अंगीकार, वैयक्तिक स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ,  प्लास्टिक बंदी या विषयावर गावातील ग्रामस्थ, शालेय विद्याथी] महिला यांचे प्रबोधन करण्यासाठी या कार्क्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रवचनकारांच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यातील ६० प्रवचनकारांची निवड राज्यस्तरावरून करण्यात आली आहे. प्रत्येक प्रवचनकाराने  २४ ग्राम पंचायतीमध्ये स्वच्छेबाबत प्रबोधन करावयाचे आहे. दि. २६ जानेवारी २०१९ रोजी जिल्हास्तरावर या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून दि. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी] २०१९ या कालावधीमध्ये हा कार्यक्रम ग्राम पंचायत स्तरावर  राबविला जाणार आहे.

या प्रवचनकारांच्या बैठकीमध्ये मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, मा. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ) जि. प. कोल्हापूर, वारकरी साहित्य परिषदेच्या  मा. सौ . मालूश्री पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळे श्री विजय पाटील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक , पा . व स्व. जि. प. कोल्हापूर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे तज्ञ् व सल्लागार उपस्थित होते .

जैनापूर, ता. शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन

जैनापूर, ता.  शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन आज रोजी ग्रामपंचायत जैनापूर, ता. शिरोळ येथे सांडपाणी प्रकल्पाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. या प्रकल्पाचे उदघाटन मा. शौमिका महाडिक, अध्यक्ष जि. प. कोल्हापूर, यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, मा. राजवर्धन नाईक-निंबाळकर, सदस्य जि. प. कोल्हापूर, मा.हेमंत कोलेकर सदस्य जि. प. कोल्हापूर,मा. सौ . राणी खमलेट्टी, सदस्य जि. प. कोल्हापूर,   मा. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ) जि. प. कोल्हापूर यांची उपस्थिती होती.

या प्रकल्पामुळे जैनापूर या गावाची सांडपाण्याची समस्या कायमची सुटली आहे. यापूर्वी गावात निर्माण होणारे सांडपाणी ग्रामपंचायतीच्या समोर साचून राहायचे त्यामुळे गावात सांडपाण्यामुळे स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न उभे राहिले होते. या सांडपाण्याचे व्यवस्थापन करणेसाठी निर्माण होणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी वापरणेचे काम हाती घेण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन करणेचा प्रस्ताव राबविणेत आला. या प्रकल्पांतर्गत ३ स्थिरीकरण तळी घेण्यात आली आहेत. या तीन स्थिरीकरण तळ्यातून शुद्ध होणारे पाणी हे शेतीसाठी वापरले जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्कम रु. १७.९१ लक्ष इतकी असून या कामासाठी प्रत्यक्ष १०. ७० लक्ष इतका खर्च झालेला आहे.

या उदघाटन कार्यक्रमास मा. श्री. राम शिंदे, मा. सौ. अर्चना चौगले, सभापती, पंचायत समिती शिरोळ, मा. श्री. संजय माने, उपसभापती, प.स. शिरोळ , मा. श्री. सुरेश कांबळे, सदस्य प.स. शिरोळ, मा. राजगोंड पाटील, सदस्य प.स. शिरोळ मा. विजयसिह जाधव, गटविकास अधिकारी, प.स. शिरोळ , मा. श्री. साठे, उपअभियंता, ग्रा.प.पु. शिरोळ, जैनापूर गावचे सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.