महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे
योजनेचे स्वरुप / माहीती :
महिलांना त्यांच्या कौटुंबिक, कायदेविषयक, सामाजिक समस्या सोडविण्यासाठी मदत तसेच कायदेविषयक मार्गदर्शन केले जाईल. तसेच योग्य त्या प्रकरणांमध्ये समुपदेशनही आयोजित केले जाईल.
(उदा. हुडांबळी प्रकरण, विभक्त कुटूंबाच्या समस्या, घरगुती अत्याचार, घरातुन बाहेर काढण्याची धमकी देणे, मारहाण करणे, रात्री-अपरात्री घरातुन बाहेर काढणे, घटस्फोटासाठी दबाव आणणे, घटस्फोट व पोटगी प्रकरण, मालमत्ता हक्क, लैगिक छळवणुक इ.)
या समुपदेंशन केंद्राद्वारे महिलांना त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक समस्या सोडविण्यासाठी मदत व कायदेविषयक मार्गदर्शन केले जाईल तसेच योग्य त्या प्रकरणांमध्ये समुपदेशनही आयोजित केले जाईल. उदा. हुडांबळी प्रकरण, विभक्त कुटूंबाच्या समस्या, घरगुती अत्याचार, घरातुन बाहेर काढण्याची धमकी देणे, मारहाण करणे, रात्री-अपरात्री घरातुन बाहेर काढणे, घटस्फोटासाठी दबाव आणणे, घटस्फोट व पोटगी प्रकरण, मालमत्ता हक्क, लैगिक छळवणुक इ. मानसिकदृष्टया असंतुलीत महिलांचे सामाजिक मानसशास्त्रीय कायदेशिर समुपदेशनही यात अंतर्भुत राहील.
सदर योजनेअंतर्गत प्रत्येक समुदपदेशन केंद्रात एक समुपदेशक यांची नियुक्ती केली जाते. त्यांचे मानधन जि.प. स्वनिधीतून अदा केले जाते.
ग्रामीण भागातील इ. 5वी ते 12वी मध्ये शिकत असलेल्या मुलींना सायकल खरेदीसाठी अनुदान देणे.
- लाभार्थी इयता 5 वी ते 12 वी पर्यंत शिकत असली पाहिजे.
- मुलगी शिकत असलेली शाळा व तिचे राहते गांव यातील अंतर कमीत-कमी 2 कि. मी. किंवा 1 कि.मी. पेक्षा जास्त असावे.
3) अर्जदार दारिद्रय रेषेखालील असेल तर तसा ग्रामसेवकाने दिलेला दाखला प्रस्तावा सोबत जोडणेत यावा.
4) शाळेत शिकत असले बाबत मुख्याध्यापक यांचा दाखला आवश्यक.
5) लाभार्थ्यांने सदर योजनेचा यापूर्वी लाभ घेतला नसलेबाबत लाभार्थीचे स्वंयघोषणापत्र आवश्यक.
6)लाभार्थीचे कुटूंबातील व्यक्ती शासकीय /निमशासकीय सेवेत नसले बाबत स्वंयघोषणापत्र आवश्यक राहील.
7) जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या स्पेशिफिकेशनप्रमाणे लाभार्थ्याने सायकलखरेदी करावी
ग्रामीण भागातील सर्वसाधारण घटकातील व अनुसूचित जातीतील महिालांना पिठाची गिरण अनुदान पुरविणे.
1 |
अर्जदार महिलेचा शाळा सोडल्याचा दाखला किवा शासकीय वैद्यकिय अधिका-याने दिलेला वयाचा दाखला आवश्य्क. |
2 |
अर्जदार महिला द्रारिद्रयरेषेखालील कुटूंबाची सदस्य असल्यास ग्रामसेवकांने दिलेला दाखला आवश्य्क. आहे. |
3 |
अर्जदार महिला दा.रे.खालील नसलेस तहसिलदार /तलाठी यांनी दिलेला मागील वर्षातील रु. 1,20,000/- पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला./अहवाल |
4 |
ग्रामसेवकांने अर्जदार महिलेस दिलेला रहिवासी दाखला अथवा स्वंयघोषणापत्र. |
5 |
अर्जदार महिलेने यापुर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याचा ग्रामसेवकांने दिलेला दाखला अथवा स्वंयघोषणापत्र. |
6 |
अर्जदार महिलेच्या कुटूंबातील सदस्य शासकीय/निमशासकीय सेवेत नसल्याचा ग्रामसेवकांने दिलेला दाखला अथवा स्वंयघोषणापत्र. |
7 |
अर्जदार महिलेच्या आधार कार्डची सत्यप्रत. |
8 |
अर्जदार महिलेच्या बँक खाते पासबुकाची सत्यप्रत. |
9 |
लाभार्थी/कुंटूंबाकडे विद्युत पुरवठयाची सोय असलेबाबत वीज बिलाची प्रत. अर्जदार महिला अनु-सूचित जाती घटकातील असल्यास जातीचा दाखला आवश्यक.सदर योजनेसाठी जि.प.स्वनिधी व जिल्हा वार्षीक योजना विघयो मधून अनुदान प्राप्त होते. |