शिक्षण विभाग ( माध्यमिक)
माध्यमिक शाळा संहिता व त्यामध्ये वेळोवेळी झालेली सुधारणा यामधील तरतूदीनुसार तसेच शालेय शिक्षण विभागकडील शासन निर्णय परिपत्रक नुसार माध्यमिक शिक्षण विभागाचे कामकाज करणेत येते. शिक्षण विभाग (माध्यमिक) कडून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक लाभ देणे तसेच नवीन माध्यमिक शाळा सुरू करणेचे प्रस्ताव शिफारशीसह शासनास सादर करणे, विद्यार्थ्यांना फी माफीचे प्रस्तावास मान्यता देवून त्यानुसार शाळांना फी बाबतचे अनुदान, अनुदानित शाळांना वेतन/वेतनेत्तर इमारत भाडे व इतर अनुषंगिक अनुदाने वितरीत केली जातात.. वेतनेतर अनुदान (२०२२-२३) शाळा -४५९ पात्र, कनिष्ठ महाविद्यालय -८४ पात्र, सैनिकी शाळा – १ पात्र
कोल्हापूर जिल्हयामध्ये अनुदानित 692 , विनाअनुदानित 66, कायम विनाअनुदानित 83, व स्वयंमअर्थसहाय्यीत 43 व कनिष्ठ महाविद्यालय 152, अवशत अनुदानित ६२ इतक्या शाळा आहेत.
शिक्षण विभाग (माध्यमिक)
शालेय सांख्यिकी माहिती
- जिल्हापरिषदेच्या एकूण माध्यमिक शाळांचीसंख्या– 04
- जिल्हापरिषद माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीसंख्या-2,183
- जिल्हापरिषद माध्यमिक शाळांमधील शिक्षकसंख्या– 53
- जिल्हयातील एकूणमाध्यमिक शाळांची संख्या-1061
- जिल्हयातील एकूण माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या– 4,56,799
- जिल्हयातील एकूण माध्यमिक शाळांमधील शिक्षक संख्या– 13,639