बांधकाम विभाग
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभाग हा विकास कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विभाग आहे. या विभागाच्या अंतर्गत राज्य शासन व जिल्हा परिषदे मार्फत देणेत येणाऱ्या अनुदानातून नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे, इमारती अंतर्गत शासकीय इमारती व निवासस्थाने इमारती बांधकामे, तालीम इमारती, समाज मंदिर, सार्वजनिक वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती व निवासस्थाने इत्यादी बांधकामांचा समावेश आहे.
बांधकाम विभागांतर्गत एकूण 6 उपविभाग अस्तित्वात असुन, या यंत्रणेमार्फत विविध विकास कामे करुन घेतली जातात. बांधकाम विभागांतर्गत इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग अशी एकूण 5450.506 कि.मी. रस्ते लांबी असुन, त्यापैकी डांबरी 3243.902 कि.मी., खडीचे 673.579 कि.मी., मुरुमी 1148.414 कि.मी. व 384.611 कि.मी. रस्ते आहेत.
आस्थापना | प्रकल्प शाखा | रेखा शाखा | लेखा शाखा |
---|---|---|---|
अधीक्षक | शाखा / कनिष्ठ अभियंता | प्रमुख आरेखक | सहाय्यक लेखाधिकारी |
वरिष्ठ / कनिष्ठ सहाय्यक | कनिष्ठ सहाय्यक | आरेखक | वरिष्ठ / कनिष्ठ सहाय्यक लेखा |
— | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | — | — |