डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून अर्थसहाय्य देण्याची योजना 5 जानेवारी 2017 च्या शासन निर्णया अन्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन 2016/17 पासून राबविण्यात येत आहे.
सन 2023-24 अंतर्गत सदरची योजना राबविण्यासाठी रु. 200.00 लक्ष इतका निधी प्राप्त झालेला आहे. 322 लाभार्थींना प्रशासकीय मंजुरी दिलेली असून त्यासाठीची रक्कम रु. 183.45 लक्ष इतकी आहे. आज अखेर 109 लाभार्थींना रु. 69.03 लक्ष इतके अनुदान अदा केले गेले आहे. अनुदान अदा करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सन 2024-25 अंतर्गत मंजूर निधी रु. 150.00 लक्ष इतका आहे. 123 बाबींच्या लाभार्थींची महाडीबीटी पोर्टलवरून सोडतद्वारे निवड झालेली असून त्यासाठीची अनुदान रक्कम रु. 76.74 लक्ष इतकी आहे. महाडीबीटी पोर्टलवर लाभार्थी निवड प्रक्रिया सुरु आहे.
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा